Anand Mahindra Saam Tv
देश विदेश

India Canada Tension: आनंद महिंद्राने कॅनडाला दिला मोठा धक्का, देशात बंद केला व्यवसाय...

Anand Mahindra News: आनंद महिंद्राने कॅनडाला दिला मोठा धक्का, देशात बंद केला व्यवसाय...

Satish Kengar

Anand Mahindra News:

गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम व्यवसायावर दिसू लागला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही मोठा निर्णय घेतला आहे.

आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कॅनडामधील आपली कंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनसोबतची भागीदारी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅनडाच्या कंपनीत महिंद्रा अँड महिंद्राची 11.18 टक्के भागीदारी आहे.

महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडामधील आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलेला असताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संघर्ष सुरू आहे. महिंद्राने आपली कंपनी बंद केल्याने कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.  (Latest Marathi News)

महिंद्रा अँड महिंद्राने कॅनेडियन कंपनी रेसन एरोस्पेस सोबतचे आपले संबंध तोडले आहेत आणि 11.18% हिस्सा विकला आहे. रेसन एरोस्पेसने कॅनडामध्ये एक निवेदन देत आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. आता महिंद्राने कंपनीसोबतचे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राने ही माहिती सेबीला दिली आहे.

दरम्यान, रेसन ही शेतीशी संबंधित टेक सोल्युशन्स बनवणारी कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा देखील शेतीशी संबंधित उत्पादने बनवते. मात्र, महिंद्र अँड महिंद्राच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Velvet Cupcake: बर्थडे किंवा पार्टीसाठी घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रेड व्हेल्वेट कपकेक

Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

Kidney deterioration symptoms: कोणत्याही लक्षणांशिवाय खराब होतेय तुमची किडनी; शरीरातील 'हे' ४ मोठे बदल वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT