INDIA bloc impeachment motion against Gyanesh Kumar saam tv
देश विदेश

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

Gyanesh Kumar Removal Motion In Parliament: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात INDIA आघाडीकडून मोठी राजकीय रणनीती आखण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हटाव प्रस्ताव आणणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Omkar Sonawane

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आता संसदेत थेट महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नामुळे विरोधकांनी हे मोठे पाऊल उचलण्याचे निश्चित केले आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून आणि देशात राबवल्या जात असलेल्या मतदार यद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय संघर्षात बदलला आहे.

यावरूनच शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, जर निवडणुकांमध्ये मतदारांची मते चोरली जात असेल यात अशा चोरीच्या मतांमधून निवडून आलेल्या खासदारांनी संसदेत मंजूर केलेले कायदे आणि केलेले संस्थात्मक बदल हे देखील पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात. गेल्या काही वर्षांपासून विरोधक हे जोरदार हल्लाबोल करत असतानाच आता निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद ही चव्हाट्यावर आले आहेत.

CJP चा इशारा

निवडणुका आयोगातील अंतर्गत वाद बाहेर आल्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने आयुक्त ज्ञानेश कुमार यांना येत्या 48 तासांत राजीनामा देण्याचा अल्टीमेटम दिला आहे. जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर देशभरात आंदोलन छेडली जातील, असा थेट इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला. तसेच आगामी सर्व निवडणुका तात्काळ थांबवाव्यात आणि वादग्रस्त ठरलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करून मतदार याद्या 2025 च्या मूळ स्थितीवर आणाव्यात अशी मागणी त्यांनी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT