India and Pakistan tensions Donald Trump Saam Tv News
देश विदेश

भारत आणि पाकिस्तान तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी नाक खुपसलं आणि हसू करून घेतलं; नेमकं काय घडलं?

India and Pakistan Tension : पण डोनाल्ड ट्रम्प तात्यानं मधी नाक खुपसलं... अन् म्हणालं मीच दोघांमधी शस्त्र संधी घडवली हाय का आता... येऊ नकू तर कुठल्या डब्यात बसू.... मग काय तात्याला सगळ्यांनीच फायलावर घेतला ...

Prashant Patil

डोनाल्ड ट्रम्प तात्या.... झाक्या हाणण्यात एक नंबर... खोट बोल पण रेटून बोल कुणाकडनं शिकावं तर ती ट्रम्प तात्याकडनं... तात्यानं विदेश दौऱ्यात झ्याल झ्याल गप्पा हाणल्या.. अन् हसू करुन घेतलं. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तनातनी जोरात हाय... भारतानं पाकिस्तानच्या चांगल्या नांग्या ठेचल्या... ऑपरेशन सिंदूर भारतानं जोरदार राबवंल अन् घाबरलेल्या पाकिस्तानच्या डीजीएमओनं आपल्या म्हजी भारताच्या डीजीएमओला फोन केला... आपल्या मोदी साहेबांनीबी हीच सांगिलतं ऐका

पण डोनाल्ड ट्रम्प तात्यानं मधी नाक खुपसलं... अन् म्हणालं मीच दोघांमधी शस्त्र संधी घडवली हाय का आता... येऊ नकू तर कुठल्या डब्यात बसू.... मग काय तात्याला सगळ्यांनीच फायलावर घेतला ... तात्या गप गार बसलं... हसू झालं अन् मारली पलटी... ट्रम्प तात्या आता पलटू तात्या झाल्यात... बघा आता काय म्हणालं तात्या

खोट बोलून पलटी मारण्याचा तात्यांचा इतिहासच राहिलाय... म्हणून आता तात्याला म्हणात्यात पलटू तात्या . आता बघा कवा कावा खोटं बोललं तात्या...तात्यांना दावा केलाय युक्रेनला 500 बिलियन डॉलरच कर्ज दिलंय... पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त 124 बिलियन डॉलर्स कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं ऐकायचं आहे का? ऐका तात्या म्हणत्यात मला इतिहास सगळ्यात जास्त मत पडली आणि निवडून आलू... पण तात्या ती ती जॉर्ज बूश नाना आठवत्यातं का? त्यांना 2005 मध्ये 92 टक्के मत पडली होती तुमच्यापेक्षा जास्त

आता खोटं नंबर तीन ऐका तात्या एकदा म्हणालं जानेवारी महिन्यात मी सहा नागरिकांना हमसच्या कैद्यातून सोडवले आणि बायडन आण्णानं एक बी सोडवला नाय . पण खरं असं हाय 2023 मध्ये हामासनं 105 नागरिकांना सोडून दिलं होतं. तवा तात्या नदीला बसलं असत्यालं

तात्याचा खोट बोलण्याचा कारनामा ऐकला आता पलटी मारण्याचा कारनामा पण ऐका...ज्याला अमेरिकेनं दहशतवादी ठरवलं होतं त्याच्या सोबतच सिरियात ट्रम्प तात्याने हात मिळवणी केली. तर दुसरीकडं जी अमेरिका रशियाच्या विरोधात युक्रेनला मदत करत होती त्या झेलन्स्की सोबतच नळावरच्या भांडणासारखा तात्या भांडला. तात्या तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हाईत... भूमिका मांडा खरी मांडा... थेट मांडा ... खोटं बोलून अन् पलटी मारून कशाला पंचाईत करुन घेता...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Shengdana Thecha: जेवणासोबत तोंडी लावयला झटपट बनवा झणझणीत मिरची शेंगदाण्याचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी पूर्ण; कोर्टाकडे रवाना

Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

Sakhe Ga Sajani: तीन मित्रांच्या प्रवासाची भन्नाट कहाणी; अभिजीत खांडकेकर आणि पूजा सावंतच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Reception Saree Look : इव्हनिंग रिसेप्शनला नेसा स्टायलिश साडी; पाहा सुंदर डिझाइन्स, सर्व पाहुण्यांमध्ये तुम्हीच उठून दिसाल

SCROLL FOR NEXT