मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीनं नवी दिल्लीतल्या महामोर्चा काढून रामलीलावर मैदानावर जोरदार आंदोलन केलं. पावसाचं सावट असतानाही इंडिया आघाडीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. रामलीला मैदानावर चिखल असतानाही मोठ्या संख्येनं आंदोलकांनी सहभाग घेतला. या महामोर्चाला इंडिया आघाडीच्या जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी ज्ञानेश कुमारांना निर्वाणीचा इशारा दिला. तर राहुल गांधींनी थेट मोदी-शाहांवर कारवाई कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय.
काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही जोरदार भाषणं केली. यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेख यादव आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी भाजपला रोखठोक इशारा दिलाय. तर ममता बॅनर्जींनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान मोदी आणि ज्ञानेश कुमारांची खिल्ली उडवलीये..
तर दुसरीकडे, विरोधकांच्या रॅलीला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपनंही दिल्लीत 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव' पदयात्रा काढली. त्य़ामुळे राजधानी दिल्लीत भाजप आणि इंडिया आघाडी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून SIR आणि निवडणुकांमधील गैरप्रकारावरून इंडिया आघाडीनं ज्ञानेश कुमारांविरोधातील लढा आणखी तीव्र केलाय. आता इंडिया आघाडीची रस्त्यावरच्या लढाईनंतर पुढची रणनीती काय याबाबत उत्सुकता लागलीय. त्यामुळे सरकार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणार की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार?... याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.