india alliance representative image
देश विदेश

इंडिया आघाडी फुटली; २२ लोकसभा खासदार असलेल्या पक्षाने घेतला मोठा निर्णय

india alliance : डीएमकेने घेतलेल्या निर्णयाने इंडिया आघाडी फुटल्याची चर्चा आहे. डीएमकेने घेतलेल्या निर्णयाची देशभरात चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

डीएमके पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याची माहिती मिळतेय

डीएमके पक्षाच्या खासदाराच्या पत्रामुळे चर्चांना उधाण

तामिळनाडुतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा फेरबदल

देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरून पायउतार झाल्या. तर तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तामिळनाडूत टीव्हीके पक्षाची सत्ता येणार आहे. टीव्हीके पक्षाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर डीएमके पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

डीएमके खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून लोकसभेत आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली आहे. 'लोकसभेत डीएमके खासदारांसाठी आसनव्यवस्थेत बदल करावा. काँग्रेससोबत युती तुटल्यानंतर आमचे खासदार त्यांच्यासोबत बसणे योग्य ठरणार नाही, असे खासदार कनिमोझी यांनी स्पष्ट केले.

द्रविड मुनेत्र कडगमच्या वरिष्ठ नेत्या कनिमोझी यांनी पत्र लिहून संसदेत २२ खासदारांसाठी दुसरीकडे बसण्याची मागणी केली आहे. खासदार कनिमोझी यांच्या पत्रामुळे डीएमके आणि काँग्रेस पक्षाची युती राष्ट्रीय पातळीवरील तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. या पत्रामुळे डीएमके पक्ष इंडिया आघाडीतूनही बाहेर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट

तामिळनाडूत टीव्हीके पक्षाची सत्ता येणार असल्याचं निश्चित झालं आहे. टीव्हीकेला ४ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. टीव्हीके पक्षाला आज शुक्रवारी सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके पक्षाने पाठिंबा दर्शवला. तामिळनाडूत ५ आमदार असलेल्या काँग्रेसने टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केलं आहे. त्यामुळे टीव्हीके पक्षाने बहुमताचा आकडा गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तत्पूर्वी, मीडिया रिपोर्टनुसार, टीव्हीकेचे प्रमुख विजय हे शुक्रवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यानंतर तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा दावा करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT