Kanpur IT Raid News Saamtv
देश विदेश

Kanpur IT Raid: रोल्स रॉयस, फेरारीसह तब्बल १०० कोटींच्या गाड्या; तंबाखू कंपनीच्या मालकाकडे सापडला कुबेराचा खजिना

Kanpur IT Raid News: नयागंज येथील बंशीधर एक्सपोर्ट आणि बंशीधर टोबॅको कंपनीवर आयकर अधिकारी सातत्याने ही कारवाई करत आहेत. या कारवाईत बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून 50 कोटींहून अधिक किमतीच्या कार सापडल्या आहेत.

Gangappa Pujari

Income Tax Raid News:

आयकर विभागाने कानपूरमधील एका तंबाखू कंपनीवर छापा टाकला. या छापेमारीत सापडलेलं घबाड पाहून अधिकारीही चक्रावून गेले. नयागंज येथील बंशीधर एक्सपोर्ट आणि बंशीधर टोबॅको कंपनीवर आयकर अधिकारी सातत्याने ही कारवाई करत आहेत. या कारवाईत बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून 50 कोटींहून अधिक किमतीच्या कार सापडल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने टाकलेल्या या छापेमारीत आतापर्यंत सुमारे 4 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये रोल्स रॉयस फँटम, मॅक्लारेन, लॅम्बोर्गिनी आणि फेरारी अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरचं नाही तर इतर राज्यांतील कंपनीशी संबंधित लोकांच्या ठिकाणांचीही चौकशी सुरू आहे. यापैकी गुजरात, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत आयकर विभाग तपास करत आहे.

या छापेमारीत आयकर विभागाने 4.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. संबंधित कंपनी खात्यांमध्ये दाखवलेल्या कंपनीला बनावट धनादेश देत होती, तर दुसरीकडे इतर मोठ्या पान मसाला घरांना उत्पादन पुरवत होती. त्यामुळे ही धाड टाकण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुमारे 80 वर्षांपासून तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या फर्मचे मालक केके मिश्रा उर्फ ​​मुन्ना मिश्रा यांचे नयागंज येथे जुने कार्यालय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी 6 वाहनांत आले आणि त्यांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला.तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांचे मोबाईलही काढून घेतले. कागदी कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली. सध्या रिअल इस्टेट, बेनामी मालमत्तांशिवाय रोख रकमेचाही शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT