Aditya Thackeray Ayodhya visit
Aditya Thackeray Ayodhya visit Saam TV
देश विदेश

हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेंच्या हस्ते शरयूतीरी आरती संपन्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अयोध्या : शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं असून अयोध्येत (Ayodhya) सर्वत्र भगवंमय वातावरण झालं होतं.

आदित्य ठाकरेंनी अयोध्येला गेल्यानंतर तेथील इस्कॉन मंदिराला भेट दिली. त्यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले, 'अयोध्येत आम्ही राजकारणासाठी नव्हे तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. आमचं हिंदुत्व स्पष्ट असून महाराष्ट्रातूनअयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी आपण अयोध्येत महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) बांधणार असल्याचं ते म्हणाले. तसंच मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे देखील पाहा -

दरम्यान, सायंकाळी त्यांनी रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर हनुमान गढीचं दर्शन घेऊन आदित्य ठाकरे हे शरयू नदीच्या तीरावरती जाऊन त्यांनी मंत्रोच्चाराच्या घोषात शरयू नदीच्या तीरावर आरती केली यावेळी १० ते १२ हजार शिवसैनिक उपस्थित होते आरतीवेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

SCROLL FOR NEXT