Corona In India
Corona In India Saam Tv
देश विदेश

देशात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 2483 नवे कोरोनाबाधित तर 1399 मृत्यू

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. देशात गेल्या २४ तासांत २४८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. १३९९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी दिवसभरात १९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६३५ झाली आहे. तर कोरोनाने चिंता वाढवली 'अशी' आहे तर पाहूया आजची ताजी स्थिती

हे देखील पाहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरामध्ये देशात १९७० रुग्ण कोरोनामुक्त (Corona) झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २३ हजार ६२२ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख २३ हजार ३११ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०४ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. देशव्यापी लसीकरणामध्ये आतापर्यंत १८७ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशामध्ये २२ लाख ८३ हजार २२४ कोरोना (Corona) लसी देण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत १८७ कोटी ९५ लाख ७६ हजार ४२३ कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग! २१ वर्षानंतर शहरातील होर्डिंगसह इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Today's Marathi News Live : पुण्यातील धोकादायक होर्डिंग काढून टाका, महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

Yavatmal News: मित्रानेच केला घात! पती ड्युटीवर जाताच पत्नीवर लैगिंक अत्याचार; यवतमाळमधील धक्कादायक घटना

Petrol Diesel Rate (16th May 2024): महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर वधारले की घसरले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Astrology Tips : सुखी- समाधानी आयुष्यासाठी घराच्या दारात काढा या रंगाचे स्वास्तिक

SCROLL FOR NEXT