Baby With 4 Legs And 4 Hands Saam Tv
देश विदेश

आश्चर्य! भारतात जन्माला आले 4 हात आणि 4 पाय असलेलं बाळ; डॉक्टर म्हणाले...

बिहारमध्ये एक असे बाळ जन्माला आले आहे, ज्याला चक्क चार हात आणि चार पाय आहेत.

वृत्तसंस्था

पाटणा : माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. पण नुकतेच बिहारमध्ये एक असे बाळ जन्माला आले आहे, ज्याला चक्क चार हात आणि चार पाय आहेत. चार हातपाय असलेल्या या बाळाची सर्वत्र चर्चा होते आहे. बिहारमध्ये (Bihar) जन्माला आलेल्या या बाळाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे. या बाळाचा फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. (Baby With 4 Legs And 4 Hands)

वृत्तानुसार, हफलागंजमधील अनुराधा कुमारी नावाची महिला कटिहार सदर दवाखान्यात प्रसूतीसाठी (Delivery) दाखल झाली होती. यादरम्यान, तिने एका विचित्र बाळाला (Baby) जन्म दिला आहे. ज्याचे एक डोकं, एक धड आहेच, पण त्याला चार हात-पाय आहेत. या घटनेला लोक दैवी चमत्कार (Miracle) म्हणत आहेत. बाळाला देवाचा अवतार मानत आहेत. खासकरून त्याला पाहण्यासाठी लोक रुग्णालयात येत आहेत.

दरम्यान, बाळाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, एका खसगी क्लिनिकमध्ये तीन ते चार वेळा अल्ट्रासाऊंट (Ultrasound) केले होते. त्याचा बाळावर परिणाम झाला असावा.

डॉक्टर म्हणाले की, हे बाळ एकदम ठणठणीत आहे. सदर रुग्णालयाची डॉक्टर शशी किरण यांनी सांगितलं, हे बाळ म्हणजे अद्भुत, विचित्र किंवा कोणताही दैवी चमत्कार नाही आहे. मेडिकल सायन्समध्ये (Medical Science) याआधाही असे घडले आहे.

हे देखील पहा-

गेल्या वर्षी बिहारच्याच गोपाळगंजमध्ये एक बाळाचा जन्म झाला होता ज्याला ही तीन हात-पाय होते. रबीना खातून (वर्ष 30) महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्यानंतर तिला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये (Health Center) दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांनी तीन हात आणि तीन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; दरांडेंनी शिवीगाळ करत बाप काढल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Khan Sir : खान सरांच्या बॉडीगार्डनेचं केला कोचिंग सेंटरमध्ये गोळीबार? 'त्या' व्हिडिओने उडाली खळबळ

Walking after dinner: मासिक पाळी अनियमित आहे? रात्रीच्या जेवणानंतर १५ मिनिटं चालण्याची सवय ठरू शकते फायदेशीर

Famous Singer Death : जादुई आवाज हरपला! ज्येष्ठ गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT