Imran Khan Saam TV
देश विदेश

Breaking: इम्रान खान सत्ता राखणार; अविश्वास प्रस्ताव फेटाळला...

त्यामुळे इम्रान खान आता सत्ता राखणार आहेत.

वृत्तसंस्था

लाहोर: अनेक दिवसांपासून इम्रान यांचे पंतप्रधान पद जाणार याबाबत चर्चा सुरु होती. परंतु पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे, तो घटनाबाह्य घोषित केला आहे. त्यामुळे इम्रान खान आता सत्ता राखणार आहेत. परंतु आता बोलताना इम्रान खान यांनी निवडणुकीसाठी तयार रहा असे आवाहान नागरिकांना केले आहे. आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीत जाऊ इच्छीतो नागरिक ठरवतील काय करायचं असेही खान म्हणाले. 25 एप्रिलपर्यंत पाकिस्तानची संसंद स्थगीत करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांचा आज पंतप्रधान पदाचा फैसला होणार होता. आज अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) मतदानापूर्वी हिंसाचार आणि संघर्षाच्या भीतीने इस्लामाबादमध्ये (Islamabad) हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. हाय अलर्ट जारी करण्यात आला होता, सरकारने राजधानीतील केट झोन सील करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये एकूण 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सर्वसामान्यांना आवारात प्रवेश दिला जाणार नाही. रेड झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त मारगला रोड खुला केला जाईल, तर इतर प्रवेश मार्गांवर तीन थरांचे कंटेनर बसवले जातील. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी रावळपिंडीत राजकीय रॅलींना इस्लामाबादमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असेही सांगण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT