Imran Khan Viral Medical Report Google
देश विदेश

Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर तुरूंगात बलात्कार, मेडिकल रिपोर्ट व्हायरल, नेमकं सत्य काय?

Imran Khan Viral Medical Report : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर तुरुंगात बलात्कार झाल्याचा दावा व्हायरल झाला आहे. मेडिकल रिपोर्टवरून मोठा गदारोळ सुरु आहे. नेमकं सत्य काय आहे? वाचा सविस्तर.

Namdeo Kumbhar

Viral Medical Report Sexual Assault on Imran Khan in Custody : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरूंगात असणाऱ्या इम्रान खान यांच्यावर बलात्कार झल्याची धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. इम्रान खान यांच्या नावाचा मेडिकल रिपोर्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर इम्रान खान यांच्यावर झालेल्या कथित बलात्काराची जोरदार चर्चा होत आहे. पण नेमकं सत्य काय आहे? इम्रान खान यांच्यावर खरेच बलात्कार झालाय का?

इमरान खान यांच्यासोबत जेलमध्ये बलात्कार?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये आहेत. याच ठिकाणी त्यांच्यासोबत बलात्कार झाल्याचा दावा करणारी एक पोस्ट व्हायरल होत आहे. मेडिकल रिपोर्टने सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. पाक अमिरात सैन्य रुग्णालयाने इमरान खान यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा या कथित अहवालात करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्याबाबतच्या या बातमीने पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या घटनेचा निषेध करत पाकिस्तानी सेना आणि सरकारवर टीका केली आहे. काहींनी या अहवालाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

व्हायरल पोस्टनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ -

इम्रान खान यांच्यावर तुरूंगात बलात्कार झाल्याच्या सोशल मीडियावरील दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे अथवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षानेही याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. याआधीही २०२३ मध्ये इम्रान खान यांच्याशी संबंधित एक बनावट करार व्हायरल झाला होता. त्यामध्ये इम्रान खान यांनी तुरुंगात छळ आणि बलात्कार टाळण्यासाठी विनंती केल्याचा दावा करण्यात आला होता. या कागदपत्रांना आणि व्हायरल पोस्ट खोट्या असल्याचे नंतर उघड झाले होते.

इम्रान खान यांच्यावर बलात्कार? नेमकं सत्य काय?

आता पुन्हा एकदा इम्रान खान यांच्याबाबत नवा दावा करण्यात आलाय. सध्या व्हायरल झालेल्या मेडिकल रिपोर्टबाबतही तपास सुरू आहे. मेडिकल रिपोर्ट खरा आहे की खोटा, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय इम्रान खान यांच्यासंबंधित पक्षानेही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे पाकिस्तानमधील जनतेत संभ्रम निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Churma Laddoo Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली आहे? मग घरच्या घरी तयार करा टेस्टी चूरमा लाडू

Kachya Kelichi Bhaji Recipe : हिरव्यागार कच्च्या केळीची चटपटीत भाजी, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील

Unseasonal Rain : साताऱ्यात बळीराजा संकटात, गारांच्या पावसाने जावळीला झोडपलं, गहू, ज्वारी पाण्यात

Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

SCROLL FOR NEXT