Pune : कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर कोयत्याने हाणामारी, मुळशी पॅटर्नचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Violent Clash on Bibwewadi Road : पुण्यातील बिबवेवाडीत भर रस्त्यावर कोयत्याने हाणामारी; सीसीटीव्हीत धक्कादायक दृश्य कैद, पोलिसांनी चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली असून, परिसरात भीतीचं वातावरण आहे.
Koyta Terror Returns to Pune
Koyta Terror Returns to PuneSaam TV News
Published On

Koyta Terror Returns to Pune: पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याचा थरार पाहायला मिळालाय. बिबेवाडीत भर रस्त्यावर कोयत्याने झालेल्या तुफानी हाणामारीनं नागरिकांची झोप उडवली. १७ एप्रिल रोजीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर (CCTV Video Goes Viral) आला आहे. याप्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटक करून आरोपींना न्यायालयात हजर केलं. कोर्टाने भिसे व पवार या सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करु शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल तपासणीद्वारे कोणत्या टोळीशी त्यांचा संबंध आहे का, हे शोधलं जात आहे.

Koyta Terror Returns to Pune
Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. याचसोबत पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.

Koyta Terror Returns to Pune
Maharashtra Politics : 'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो...' अजितदादांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com