The IMF has approved a $1 million loan to Pakistan 
देश विदेश

IMF कडून पाकड्यांना 1 दशलक्ष डॉलर कर्ज, शहबाज शरीफ यांचा दावा

IMF ने पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर कर्ज दिलं असून भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. शहबाज शरीफ यांनी या निर्णयाचे स्वागत करत भारताच्या प्रयत्नांना अपयशी ठरवलं असल्याचं म्हटलंय.

Namdeo Kumbhar

IMF loan to Pakistan : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थात IMF ने पाकिस्तानला एक दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केलेय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाद शरीफ यांच्या कार्यालयाने हा दावा केला आहे. एक दक्षलक्ष डॉलरचे कर्ज पाकिस्तानला 7 अब्ज डॉलरच्या विस्तारित निधी सुविधा (EFF) अंतर्गत कर्ज मंजूर करण्यात आल्याचे समजतेय. पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर न करण्याची मागणी भारताने केली होती. पण आयएमएफने भारताच्या मागणीला डावलून हा निर्णय घेतला.

भारताने आयएमएफच्या बैठकीत पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कारवायांवर आणि कर्ज परतफेडीच्या खराब इतिहासावर जोरदार आक्षेप नोंदवला होता. पाकिस्तान गेल्या ३५ वर्षांत २८ वर्षे आयएमएफकडून कर्ज घेत आहे.पण त्यांच्याकडून कर्ज परतफेड होत नाहीच, त्याशिवाय अटींचे पालनही होत नाही, असा दावा भारताने केला होता. भारताने या कर्जाचा दहशतवादी कारवायांसाठी दुरुपयोग होण्याची भीती व्यक्त करत मतदानातून माघार घेतली होती. भारताने आयएमएफ, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडील पाकिस्तानच्या कर्जाचे पुनरावलोकन करण्याची मागणीही केली.

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आयएमएफच्या निर्णयाचे स्वागत केले. भारताचा डाव अयशस्वी झाल्याचा दावाही पाकड्यांनी केला.पाकिस्तानचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, भारताने आक्रमक धोरणाने लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आयएमएफने त्यांची दिशाभूल नाकारली. शरीफ यांनी या कर्जामुळे कर सुधारणा, ऊर्जा क्षेत्र सुधारणा आणि उद्योग-उपयोगितांच्या किंमतीत समायोजनाला गती मिळेल, असे सांगितले.

आयएमएफने मार्चमध्ये या कर्जाच्या पहिल्या द्वैवार्षिक पुनरावलोकनासाठी कर्मचारी-स्तरीय करार केला होता, ज्यामध्ये कर संरचनेत सुधारणा आणि कार्बन लेव्ही यांचा समावेश आहे. या कर्जामुळे पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणांऐवजी दहशतवादाला खतपाणी मिळेल, असा इशारा भारताने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT