Dark clouds gather as IMD predicts heavy rainfall across multiple Indian states amid ongoing heatwave. saam tv
देश विदेश

कडाक्याच्या उन्हात IMD ने दिली गारेगार बातमी; 12 पेक्षा अधिक राज्यांमध्ये पाऊस कोसळणार

Imd Rain Alert 12 States Heatwave Monsoon Update India: कडाक्याच्या उष्णतेदरम्यान आयएमडीने दिलासा देणारी बातमी दिली आहे. देशातील 12 पेक्षा अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मान्सूनही यंदा वेळेआधीच सक्रिय होत आहे.

Omkar Sonawane

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून वेगाने भारताच्या दिशेन सरकत असून त्यासाठी हवामान देखील अनुकूल आहे. सध्या मान्सून आपल्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक आठवडा पुढे चालत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी (19 मे) सकाळपासूनच सूर्य आग ओकत आहे. त्यामुके किमान तापमान 28.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे 1.7 अंशांनी जास्त आहे. या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली आणि आसपासच्या परिसरात उष्णतेच्या लाट येणार असून यलो अलर्ट जारी केला असून शहरातील काही भागांमध्ये पारा 44 अंशांच्या पार जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

वादळी वाऱ्यासाह हलक्या पावसाची शक्यता

दिल्ली NCR साठी केलेल्या अंदाजात आयएमडीने म्हटले की, 19 ते 22 मे दरम्यान आकाशात ढगाळसदृश्य परिस्थिति राहील आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्यावेळी विजेच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि वादळ येऊ शकते.

राजस्थान आणि हरियाणात उष्णतेची लाट कायम

दुसरीकडे राजस्थान आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम राजस्थान: १९ ते २३ मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

हरियाणा आणि पूर्व राजस्थान: १९ ते २१ मे दरम्यान उष्णतेची लाट राहू शकते.

मान्सूनबाबत हवामान विभागाची 'गुड न्यूज'

हवामान अंदाबाबात आयएमडीने एक आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनने वेग पकडला असून तो आपल्या ठरलेल्या वेळेच्या सुमारे एक आठवडा आधीच देशाच्या दक्षिणी भागाकडे सरकत आहे. हवामान विभागानुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आज १९ मे रोजी दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, मालदीव, कोमोरिन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर आणि मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत पुढे सरकला आहे. पुढील २-३ दिवसांत तो या भागांतील उर्वरित क्षेत्रांमध्येही सक्रिय होऊ शकतो. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल आहे.

'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rainfall Alert)

आयएमडीने इशारा दिला आहे की, १९ ते २५ मे दरम्यान खालील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो:

पश्चिम किनारपट्टी आणि द्वीपकल्प: कर्नाटक, कोकण, गोवा आणि केरळ.

विशेष इशारा: कर्नाटकात २० आणि २१ मे रोजी, तर कोकण भागात २१ मे रोजी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर राज्ये: तामिळनाडू, पुडुचेरी, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये १९ आणि २० मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ईशान्य भारत आणि हिमालयीन पश्चिम बंगाल/सिक्कीम: पुढील ४ दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

Maharashtra News Live Update: - कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Surya Namaskar For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी किती वेळा सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो?

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना झटका, सरकार कारवाई करणार; आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT