Rainfall Alert  x
देश विदेश

Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

Rainfall Alert : पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून परतण्यासाठीची अनुकूल परिस्थिती आहे. या दरम्यान दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • नैऋत्य मान्सून परतण्यासाठीची अनुकूल परिस्थिती.

  • दक्षिण भारतातील राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार.

  • नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान खात्याचे आदेश.

Weather Update Rainfall Alert : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, तेलंगणात; संपूर्ण झारखंड राज्यात आणि ईशान्य भारतात पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यादरम्यान दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवसांमध्ये केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांमधील नागरिकांना हवामान विभागाने सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये मध्यम स्वरुपात पाऊस पडेल असे म्हटले जात आहे.

१२-१८ ऑक्टोबर दरम्यान केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३-१४ ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचा भाग आणि यानम येथे जोरदार पाऊस पडेल. १२-१६ ऑक्टोबर दरम्यान केरळ, माहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारा, यानम, रायलसीमा, तेलंगणा येथे आणि १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी लक्षद्वीप येथे विजांसह वादळे आणि जोरदार वारे वाहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

१२ ऑक्टोबर रोजी ओडिशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. १२-१४ ऑक्टोबर दरम्यान ओडिशात आणि १४-१६ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त ईशान्य भारतात, १२-१३ ऑक्टोबर रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना बायकोनं पकडलं; झिपऱ्या धरून नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात लय बेकार चोपलं

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

SCROLL FOR NEXT