Weather News Saam tv
देश विदेश

Weather News: आला उन्हाळा तब्येत सांभाळा! एप्रिल-मेमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होणार, IMD चा इशारा

IMD News: एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभगाने व्यक्त केला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल.

साम टिव्ही ब्युरो

Weather News:

एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभगाने व्यक्त केला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. यासोबतच उष्णतेची लाटही सुरू होणार आहे. हवामान विभगाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी सांगितले की, आज जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस पडणार आहे. तसेच नवी दिल्लीबाबतही त्यांनी अलर्ट जारी केला आहे. कुमार म्हणाले की, येत्या काही दिवसांत दिल्लीत मुसळधार पाऊस पडू शकतो.

नरेश कुमार यांना विचारण्यात आले की यावर्षी उन्हाळ्यात अपेक्षित तापमान किती असेल? याच प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, याबाबत काहीही बोलणे घाईचे तारू शकते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचे चित्र आहे. यासोबतच एप्रिल आणि मे महिन्यात उष्ण वारेही वाहू लागतील. ते म्हणाले, 'येत्या एप्रिलमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील, असा अंदाज आहे. यासोबतच देशाच्या मध्यवर्ती भागातही उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुमार यांनी सांगितलं की, मे महिना हा या वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरू शकतो, असा अंदाज आहे. तसेच उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला मे महिन्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. पुढील तीन महिने अत्यंत उष्ण असणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.   (Latest Marathi News)

दरम्यान, येत्या काही दिवसांत हवामान कसे असेल याची माहितीही त्यांनी दिली. नरेश कुमार यानीस अंगितलं की, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर-पश्चिम भारतात होऊ शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमधील चार जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा

जम्मू आणि काश्मीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (JKDMA) येत्या 24 तासांत काश्मीर खोऱ्यातील चार जिल्ह्यांच्या वरच्या भागात हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा, बांदीपोरा, गांदरबल आणि बारामुल्ला जिल्ह्यांतील 2400 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर मध्यम धोक्याच्या पातळीचे हिमस्खलन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजित पवारांचा जन्म कुठे झाला? जाणून घ्या त्यांचे सुरुवातीचे जीवन

Ajit Pawar Death : कार्यकर्त्यांना जपणारा नेता....उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death : अजित पवारांचं फोनवरून शेवटचं बोलणं कुणासोबत झालं?

Ajit Pawar Death News LIVE Updates : दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला- अमित देशमुख

Ajit Pawar passed away: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, Raj Thackeray यांनी ट्विट करत अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT