अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरात चक्रीवादळ सक्रिय
२८ ऑक्टोबरला आंध्र किनाऱ्यावर तीव्र वादळ धडकणार
वाऱ्याचा वेग ताशी ११० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा
राज्यात उन्हाचा ताप कायम असताना पावसाची रिमझिम सुरु आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वार्तवला आहे. अशातच देशावर येत्या काही दिवसांमध्ये चक्रीवादळाचं नवं सावट येणार आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या तीव्र हालचाली सक्रिय झाल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत देशात तीव्र चक्रीवादळ वादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वाऱ्याचा वेग ताशी ११० किमी पर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. IMD ने बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सक्रिय चक्रीवादळाच्या हालचाली पाहिल्या आहेत, ज्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD भुवनेश्वरच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, २६ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात ते एका तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल, ते आणखी तीव्र होईल आणि २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी किंवा रात्री मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळ आंध्र प्रदेश किनाऱ्यावर धडकेल.
पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा पट्टा हळू हळू ताशी १२ किमी वेगाने पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे. तो गोव्याच्या पश्चिम-वायव्येकडे अंदाजे ४५० किमी आणि मुंबईच्या नैऋत्येकडे ४३० किमी अंतरावर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होईल परंतु सध्या भारतीय किनाऱ्यावर त्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नाही. तथापि, उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सक्त सल्ला देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.