India Weather Update saam tv
देश विदेश

India Weather Update: काळजी घ्या! राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, 'या' राज्यात पडणार मुसळधार पावसाचा इशारा

Priya More

Delhi News: उन्हाच्या तडाख्यामुळे (Heatwave) राज्यासह देशभरातील जनता हैराण झाली आहे. एकीकडे सर्वजण पावसाच्या (Rainfall) प्रतीक्षेत आहे तर दुसरीकडे तापमान वाढीमुळे उकाडा आणखी वाढत चालला आहे. अशामध्ये हवामान खात्याने (Weather Department) पुन्हा पुढचे दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. देशातील काही राज्यांमध्ये तापमान वाढणार आहे तर काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याने (IMD Alert) दिला आहे.

तापमान 45 अंशाच्या वर -

देशभरातील अनेक राज्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. सध्या अनेक राज्यातील तापमान हे 45 अंशाच्या वर गेले आहे. अशामध्ये आता हे तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आज कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये देखील तापमान वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तवली आहे.

या राज्यात पडणार मुसळधार पाऊस -

देशातील हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये या राज्यातील तापमान 42 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. ऐकीकडे हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आण त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मान्सून अंदमान-निकोबारला दाखल होणार -

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, 20 ते 22 मे दरम्यान दक्षिण उत्तर प्रदेश, पश्चिमी राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये तापमान वाढीचा कहर पाहायला मिळेल. तर उत्तर पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढच्या पाच दिवसांपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. मान्सूनबाबत हवामान खात्याने सांगितले की, येत्या 24 तासांमध्ये मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान- निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT