Fact Check  google
देश विदेश

IIT Baba News: भर कार्यक्रमात IIT बाबाला काठीनं झोडलं, पोलिसांनी नोंदवली नाही कंप्लेंट; लाईव्ह येत म्हणाला..

IIT Baba Attacked During Live Interview: आयआयटी बाबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला भर कार्यक्रमात मारहाण करण्यात आली आहे. आयआयटी बाबाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत याची माहिती दिली आहे.

Bhagyashree Kamble

महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा प्रचंड प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आयआयटी बाबानं भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्याबद्दल भाकित केलं होतं. त्यानं केलेलं भाकित खोटं ठरलं आणि बाबा प्रचंड ट्रोल झाला होता. आता आयआयटी बाबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला भर कार्यक्रमात मारहाण करण्यात आली आहे.

बाबाने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र, मुलाखतीदरम्यान, बाबासोबत गैरवर्तन करण्यात आलं. त्याला जबरदस्तीनं कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काठीनं हल्लाही केला. बाबानं ही माहिती इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे दिली आहे. बाबावर हल्ला नेमका कुणी केला आणि केला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आयआयटी बाबांनी सांगितले की, '२८ फेब्रुवारीला एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. चर्चेदरम्यान अचानक वातावरण बदलले. भगवे कपडे घातलेले काही लोक स्टुडिओमध्ये आले. नंतर हल्ला करण्यात आला. हल्ला करत जबरदस्तीनं एक खोलीत कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला.

नंतर एका स्वामी वेदमुर्ती नंद सरस्वती यांनी कॅमरा बंद करून काठीनं वार केले'. ही सगळी माहिती आयआयटी बाबानं आपल्या इन्स्टाग्राम लाईव्हवर येत याची माहिती शेअर केली. घटनेनंतर आयआयटी बाबा थेट नोएडा सेक्टर १२६ येथील पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. असा आरोप बाबाने केला आहे. या घटनेनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT