...Then Elon Musk will have to pay Parag Agrawal $42 million Saam Tv
देश विदेश

भारतीय सीईओला पदावरुन हटवणं एलॉन मस्कला पडेल महागात; द्यावी लागणार मोठी रक्कम

...Then Elon Musk will have to pay Parag Agrawal : ट्विटरशी केलेल्या करारानुसार जर पराग अग्रवाल यांना १२ महिन्यांच्या आत सीईओ पदावरून हटवलं गेलं तर त्यांना मोठी रक्कम मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया वेबसाईट ट्विटर आता लवकरच अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची होणार आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी पाच महिन्यांपुर्वीच ट्विटरवची कमान सांभाळली होती. मात्र आता पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या (Twitter) सीईओ पदावरुन हटवले जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र असं जर झालं तर ते एलॉन मस्क यांना महागात पडणार आहे. ट्विटरशी केलेल्या करारानुसार जर पराग अग्रवाल यांना १२ महिन्यांच्या आत सीईओ पदावरून हटवलं गेलं तर त्यांना तब्बल $42 million म्हणजे भारतीय रुपयांच तब्बल ३२१.६ करोड रुपये ट्विटरकडून मिळतील. त्यामुळे ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना सीईओ पदावरुन हटवलं तर मस्क यांना चांगलाच आर्थिक फटका बसू शकतो. (...Then Elon Musk will have to pay Parag Agrawal $42 million)

हे देखील पाहा -

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे. या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. ट्विटरच्या खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित करत असल्याचे मस्क यांनी नुकतेच सांगितले होते. ट्विटरनं हा व्यवहार पक्का केला असून यावर्षीच ही डील पूर्ण होईल. त्यामुळे आता ट्विटर एक प्रायव्हेट कंपनी असेल ज्याचे मालक एलॉन मस्क असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्कच्या ऑफरवरून ट्विटरच्या बोर्डमध्ये चर्चा सुरू होती. नागरिकांना आपले मत स्वतंत्रपणे मांडता यावे यासाठी ट्विटरला खाजगी केले पाहिजे, असे मस्क यांचे म्हणणे आहे, आणि त्यामुळे त्यांनी ट्विटर विकत घेण्याचा निर्णय घेतला. ट्विटरमधील 9% स्टॉक विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी, मुक्त मतांसाठी Twitter खाजगी असणे आवश्यक आहे, असे एलॉन मस्क यांनी म्हटले होते. मस्क यांचे Twitter Inc मध्ये 100% स्टॉक असेल. त्यांनी ट्विटर प्रति शेअर 54.20 डॉलर (जवळपास 4148 रुपये) या दराने विकत घेतले आहे.

ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी २९ नोव्हेंबर २०२१ ला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ट्विटरच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख व आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी (IIT) पराग अग्रवाल हे नवे सीईओ बनले होते. मात्र आता ट्विटर एलॉन मस्क यांच्या मालकीचे होणार असल्याची प्रक्रिया सुरु झाली असून पराग अग्रवाल यांना एलॉन मस्क सीईओ पदावरुन हटवण्याची चर्चाही सुरु झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT