Chhattisgarh Election Results 2023 SAAM TV
देश विदेश

Chhattisgarh Bjp CM Face: छत्तीसगडमध्ये BJP जिंकली तर कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नावांची होत आहे चर्चा

Satish Kengar

Chhattisgarh Election Results 2023: 

छत्तीसगडमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवली. एकीकडे काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता, तर दुसरीकडे भाजपने मोदी आणि पक्षाच्या व्हिजनवर ही निवडणूक लढवत होती. केंद्रातील भाजप ज्याप्रमाणे काँग्रेसला विचारते की, त्यांचा पंतप्रधान चेहरा कोण असेल. त्याच धर्तीवर काँग्रेस छत्तीसगडमध्ये भाजपला हा प्रश्न विचारत आहे.

यातच सुरुवातीचे जे संकेत मिळत आहेत त्यावरून राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. अशातच राज्यात भाजप सरकार आलं, तर कोण मुख्यमंत्री होऊ शकतो, हे जाणून घेऊ.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या नावांची होत आहे चर्चा

येथे चार नावांची मोठी चर्चा आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सरोज पांडे, माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांची नावे येतात. इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC मधील मोठ्या चेहऱ्यांमध्ये बिलासपूरचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, माजी विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक, दुर्गचे खासदार विजय बघेल, विरोधी पक्षनेते नारायण चंदेल, माजी मंत्री अजय चंद्राकर, युवा नेते ओपी चौधरी यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

असं असलं तरी राज्यात आदिवासी मुख्यमंत्र्याची मागणीही सातत्याने होत आहे. अशा परिस्थिती अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील राज्यातील बड्या चेहऱ्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, माजी राज्यसभा सदस्य रामविचार नेताम, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साई, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा लतादीदी यांची नावे पुढे आली आहेत.

दरम्यान, 2018 मध्ये भाजपने डॉ. रमण सिंह यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी भाजपने मुख्यमंत्री कोण होईल, याची घोषणा न करता ही निवडणूक लढवली. ज्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे. आज मतदान मोजणीची सुरुवात होताच, काँग्रेस आघाडीवर दिसत होती. मात्र पुढील दोन तासांत हे चित्र बदललं. आता राज्यातील 90 विधानसभा जागांपैकी 53 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT