Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

दिल्ली: "...तर राजकारण सोडेन"; केजरीवालांचे भाजपला खुले आव्हान !

दिल्ली महानगरपालिका निवडणुकांपूर्वी तीन एमसीडी एकत्र करण्याच्या विधेयकावरून गोंधळ सुरूच आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी महापालिका निवडणुका (Municipal Corporation of Delhi Elections 2022) पुढे ढकलल्याबद्दल भाजपवर निशाणा साधत एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलत असताना केजरीवाल म्हणाले की, भारतीय जनता (BJP) पक्षाने या निवडणुका जिंकल्यास आम आदमी पक्ष (AAP) राजकारण सोडेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली, उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तिन्ही नागरी संस्थांना पूर्वीप्रमाणे एकत्र आणण्यासाठी एक विधेयक मंजूर केल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली आहे.

"...तर राजकारण सोडून देणार";

केजरीवाल यांनी दिल्ली (Delhi) विधान सभेच्या बाहेर पत्रकारांना सांगितलं की, "जर भाजप MCD निवडणूक वेळेवर घेऊन त्या जिंकून दाखवल्या तर आम्ही हे राजकारण सोडून देऊ."

ते ट्विट करून म्हणाले आहेत की, BJP स्वतःला जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणवतो. हे कमाल आहे.जगातील सर्वात मोठा पक्ष एका छोट्या आम आदमी पक्षाला घाबरून पळून गेला ? हिम्मत असेल तर, MCD चे निवडणूक वेळेवर दाखवा.

निवडणूक पुढे ढकलणे शहिदांचा अपमान- केजरीवाल

ते पुढे म्हणाले की, निवडणूक पुढे ढकलणे हा शहिदांचा अपमान आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले की, भाजपचे दिल्लीतील महापालिका निवडणूका पुढे ढकलणे हा त्या शहिदांचा अपमान आहे ज्यांनी इंग्रजांना देशाच्या बाहेर पळवून लावून लोकसत्ता प्रस्थापित करण्यासाठी बलिदान दिले. आज हे पराभवाच्या भीतीने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत, उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलणार आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT