पंढरपूर: अल्पवयीन मातेचं अर्भक सापडलं रस्त्याच्या मध्यभागी; तिघांच्या शारीरिक संबंधांचा पोलिसांकडून छडा!

पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त एक तासापूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीचे बाळ रस्त्याच्या मधोमध सोडून पलायन केले.
पंढरपूर पोलीस, स्टेशन
पंढरपूर पोलीस, स्टेशनभारत नागणे
Published On

भारत नागणे

पंढरपूर: पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त एक तासापूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीचे बाळ रस्त्याच्या मधोमध सोडून पलायन केले. या घटनेच्या तपासात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. तर या गुन्ह्यात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. (Pandharpur Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील अविनाश नागनाथ वसेकर (वय ३२) हे त्यांचे कुंटूबासह शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मायाक्का चिंचणी देव दर्शना करीता त्यांची चारचाकी गाडीने जात होते. या, दरम्यान ते नारायण चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीच्या समोर साईराज ढाब्याजवळ आले. त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक अंदाजे १ ते २ तासापुर्वीचे जन्मलेले असल्याचे दिसुन आले. त्यानंतर त्यांनी, त्या बाळास उपचारासाठी डॉ. शितलशाह हस्पीटल पंढरपुर येथे आणुन दाखल केले. त्याठिकाणी बाळावर त्या रुग्णालयात १७ दिवस मोफत उपचार करण्यात आले.

पंढरपूर पोलीस, स्टेशन
नाशिक : ST कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या!

उपचारानंतर बाळाला नवरंगे बालकाश्रमात देखभालीसाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अल्पवयीन आई मुलगी, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, आई, वडील यांच्या पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुली बरोबर तिघांनी वेळोवेळी...;

या प्रकरणात संबंधित लोकांना अटक केल्यानंतर त्या लहान बाळाची आई अल्पवयीन असल्याचे उघड झाले. मात्र त्या अल्पवयीन मुली बरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्किल झाले आहे. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे व दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांना अटक केली असून आणखीन एकाच्या शोधात पोलीस आहेत.

हे देखील पहा-

दोघांसह चार जणांचे डी एन ए तपासण्यासाठी पाठवले;

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांसह चार जणांचे डी एन ए तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com