

अभिजित सोनावणे
नाशिक : नाशिकमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. शिवनाथ फापाडे असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. फापाडे शहापूर आगारात कामाला होते. (Nashik Breaking News)
गेले आठ वर्ष्यापासून फापाडे एसटी महामंडळात एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्माच्यार्यांचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. विलीनीकरण व्हावे, ही फापाडे यांची इच्छा होती. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यात ड्युटी नसल्याने आर्थिक संकट सुद्धा होते. पत्नी आणि तीन मुलं त्यांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत आत्महत्या केली असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय. तर गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
दरम्यान, आजच्या अहवालावरून एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी अखेरीस निराशाच पडली आहे. एसटी विलीनीकरणाचा अहवाल मंजूर केला गेला आहे. यात एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.