अमरावती: मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस अन् केला बॅड टच!

मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कापून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील नामांकित दिल्ली पब्लिक स्कुल इंग्रजी शाळेत मंगळवारी उघड झाली.
Delhi Public School And Rajapeth Police Station
Delhi Public School And Rajapeth Police Stationअरुण जोशी
Published On

अरुण जोशी

अमरावती : मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कापून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील नामांकित दिल्ली पब्लिक स्कुल इंग्रजी शाळेत मंगळवारी उघड झाली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित ४८ वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Delhi Public School And Rajapeth Police Station
मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे; 'तो' व्हिडीओ पोस्ट करत मनसेला आठवली दुनियादारी!

राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये बालकाचे केस कापल्याची घटना घडली. हा सहा वर्षीय मुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, मुलासोबत घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी वडील मंगळवारी शाळेत पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकाने त्यांनादेखील अश्लील शिवीगाळ केली. ‘तुला माहीत नाही, ही शाळा कुणाची आहे. तो तुझा बाप आहे. गपचूप मुकाट्याने येथून निघून जा,’ अशी धमकी वडिलांना मुख्याध्यापकांनी दिली. या प्रकारामुळे वडिलांनी त्याच दिवशी दुपारी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुख्याध्यापकाला तत्काळ अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com