Agnipath Scheme Saam Digital
देश विदेश

Agnipath Scheme : ड्युटीवर असताना अग्निवीराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना काय मिळतं? अग्निपथ योजनेचे काय आहेत नियम?

Agnipath Scheme Facilities : नाशिक मिलिटरी कॅम्पमध्ये शुक्रवारी नियमित प्रशिक्षणादरम्यान तोफखान्यात स्फोट झाला. यात २ अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. त

Sandeep Gawade

नाशिक मिलिटरी कॅम्पमध्ये शुक्रवारी एक मोठा अपघात झाला होता. नियमित प्रशिक्षणादरम्यान काही सैनिक तोफखान्यातील फायरिंगचा सराव करत होते, त्याच वेळी अचानक स्फोट झाला. या अपघातात दोन अग्निवीर जवान गंभीर जखमी झाले होते.त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण कॅम्पमध्ये गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांकडून स्फोटाचे अचूक कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून या दोन्ही जवानांना शहीदाचा दर्जा द्यावा आणि त्यांच्या कुटुंबांना योग्य ती मदत करण्याची मागणी केली आहे.

ड्युटीवर असताना अग्निवीराचा मृत्यू झाला तर अग्निपथ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला काय मिळतं?

अग्निपथ योजना कधी सुरू झाली होती?

केंद्र सरकारने २०२२ मध्ये भारतीय सैन्यात जवानांची भरती करण्यासाठी अग्निपथ योजना य सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सैन्यात जवानांची ४ वर्षांसाठी भरती केली जाते आणि या जवानांना अग्निवीर असं म्हणतात. या योजनेअंतर्गत सशस्त्र दलांमध्ये सैनिकांच्या भरतीसाठी १७.५ ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे. अग्निपथ योजनेद्वारे भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेनेत हजारो सैनिकांची भरती झाली आहे.

अग्निवीरांना किती वेतन मिळते?

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना म्हणजेच अग्निवीरांना नोकरीच्या पहिल्या वर्षात दर महिन्याला ३०,००० रुपये वेतन मिळतं. ज्यापैकी त्यांना २१,००० रुपये हाती मिळतात आणि उर्वरित ९,००० रुपये सेवा निधी फंडासाठी कापले जातात. प्रत्येक वर्षी त्यांच्या वेतनात १० टक्के वाढ होते आणि त्यातील ३० टक्के रक्कम सेवा निधी फंडात जमा केली जाते.

जेव्हा त्यांची सेवा समाप्त होते, तेव्हा नोकरीच्या पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत त्यांच्याकडून कापलेली रक्कम त्यांना परत मिळते, आणि सरकार ती रक्कम दुप्पट करून देते. यामुळे अग्निवीरांना ४ वर्षांच्या सेवेनंतर जवळपास १० लाख रुपये मिळतात.

ड्युटीवर मृत्यू झाल्यास कुटुंबाला काय मिळते?

जर एखाद्या अग्निवीराचा ड्युटीवर मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जातं. आर्मीच्या वेबसाइटनुसार, ड्युटीवर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ४८ लाख रुपयांचा विमा संरक्षण, ४४ लाख रुपयांची अतिरिक्त अनुग्रह रक्कम, उर्वरित कालावधीतील संपूर्ण वेतन आणि सेवा निधी फंडाची रक्कम दिली जाते.

ड्युटीवर अपंग झाल्यास काय मिळते?

जर एखादा अग्निवीर ड्युटीवर अपंगत्त्व आलं तर आर्थिक सहाय्य दिले जाते. जर अग्निवीर १०० टक्के अपंग झाला तर त्याला ४४ लाख रुपये मिळतात. जर तो ७५ टक्के अपंग झाला तर त्याला २५ लाख रुपये मिळतात, आणि ५० टक्के अपंगत्वासाठी त्याला १५ लाख रुपये मिळतात. याशिवाय, त्याला ४ वर्षांचे संपूर्ण वेतन, सेवा निधी फंडातील रक्कम आणि सरकारकडून देखील योगदान मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT