IAS Tina Dabi Sister Ria Dabi Marriage Saam TV
देश विदेश

IAS Ria Dabi Marriage: आयएएस टीना डाबी यांच्या बहिणीने गुपचूप उरकलं लग्न; कोर्ट मॅरेज करत दिला सर्वांनाच धक्का

Satish Daud

IAS Ria Dabi Marriage News: राजस्थानमधील जैसलमेरच्या आयएएस अधिकारी टीना डाबी (IAS Tina Dabi) यांची धाकटी बहिण रिया डाबीने गुपचूप लग्न उरकलं आहे. रिया डाबीने आयपीएस अधिकारी मनिष कुमार यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. दोघांनीही एप्रिलमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस मनीष कुमार यांचे कॅडर महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये बदलल्यानंतर हे लग्न उजेडात आले आहे.

रिया डाबी सुद्धा आयएएस अधिकारी असून त्यांचे पती मनीष कुमार हे आयपीएस अधिकारी आहेत. रिया आणि मनीष दोघेही UPSC २०२१ बॅचचे अधिकारी आहेत. रिया डाबी राजस्थान केडरमधील आहेत, तर आयपीएस मनीष कुमार हे महाराष्ट्र कॅडरचे आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये आधी मैत्री होती. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न (Marriage) केले. घरच्यांच्या मान्यतेनंतर दोघांनी परस्पर संमतीने कोर्ट मॅरेज केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये केडर बदलण्याचे कारण राजस्थान कॅडरच्या आयएएस रिया डाबीसोबत लग्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटिफिकेशन आणि दोघांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रिया डाबीचे अभिनंदन होत आहे.

टीना डाबी या सध्या जैसलमेर (Rajasthan) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. त्या २०२१ बॅचच्या IAS अधिकारी असून अलवरमध्ये आपली सेवा बजावत आहे. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी टीना डाबीच्या दुसऱ्या लग्नाचा पहिला फोटो रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.

आयएएस टीना डाबीचा पहिला विवाह २०१५ बॅचचा दुसरा टॉपर अतहर आमिर खानसोबत २०१८ साली प्रेमविवाह होता. मात्र दोघांचे लग्न दोन वर्षांहून अधिक काळ टिकले नाही. २०२० मध्ये जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात या दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. यानंतर टीना डाबीने राजस्थानच्या आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT