वरिष्ठ आयएएस अधिकारी पंकज अग्रवाल यांना सीबीआयने अटक केली
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.
हरियाणा सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने तपास सुरू केला.
सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभागाने) आयएएस (IAS) अधिकारी पंकज अग्रवाल यांना अटक केली. आयडीएफसी बँकेच्या शाखेत असलेल्या हरियाणा स्कूल शिक्षा परियोजना परिषद' (HSSPP) आणि 'हरियाणा राज्य कृषी पणन मंडळ' (HSAMB) यांच्या खात्यांमधील सरकारी निधी लाटल्याप्रकरणी सीबीआयनं आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. चंदीगडमधील सेक्टर ३२ येथील IDFC फर्स्ट बँकेच्या शाखेत गैरप्रकार झालाय. (IAS Officer Pankaj Agarwal Arrested in ₹500 Crore Fraud Probe, Administrative Circles Shocked)
हरियाणा सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने (CBI) हे प्रकरण हाती घेतले. सरकारच्या वित्त विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून ही खाती उघडण्यात आली होती. त्यानंतर त्यात निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याची बाब तपासात उघड झाली. ही खाती तत्कालीन प्रधान सचिव पंकज अग्रवाल यांच्या कार्यकाळात उघडण्यात आले होते.
या विभागीय खात्यांमधील निधी फसव्या व्यवहारांद्वारे फेरफार करण्यात आला होता. त्यामुळे सरकारचे ६०.५४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासादरम्यान पंकज अग्रवाल यांच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात आले.
हरियाणा सरकार आणि चंदीगड प्रशासनाच्या 'आयडीएफसी फर्स्ट बँक' (IDFC First Bank) खात्यांमधून एकूण ६५७ कोटी रुपयांची अफरातफर झाली होती. त्याचप्रकरणाच सीबीआय तपास करत असून त्याची मुळे आता आयएएस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली आहेत. हा त्याच प्रकरणाच्या तपासाचा भाग आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेकायदेशीर व्यवहारांमुळे हरियाणा सरकारचे एकूण ५०४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
तर चंदीगड प्रकरणातील नुकसान १५३ कोटी रुपये झाले आहे. याप्रकरणी पंकज अग्रवाल यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही सीबीआयकडून देण्यात आली आहे.
हरियाणा सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने (CBI) या प्रकरणाचा तपास हाती घेतलाय. सीबीआयच्या तपासदरम्यान पंकज अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे आणि दोष सिद्ध करणारे पुरावे गोळा करण्यात आलेत.सीबीआयने हरियाणातील या प्रकरणात १७ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक/एयू स्मॉल फायनान्स बँकेचे सहा अधिकारी, हरियाणा सरकारचे तीन कर्मचारी, दोन कंपन्या आणि सहा खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. पंचकुला महानगरपालिकेतील निधीच्या गैरव्यवहाराप्रकरणी वरिष्ठ आयएएस अधिकारी आर. के. सिंग यांना अटक करण्यात आली आहे. याचाही या प्रकरणात समावेश आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.