Crime Saam Tv
देश विदेश

'किती दिवस पळणार...', IAS ऑफिसरला पूर्व पतीकडून धमकी

जुलै 2020 मध्ये दोघांनी एकमेकांपासून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

वृत्तसंस्था

लखनऊ - उत्तर प्रदेशातील एका महिला IAS अधिकाऱ्याने आपल्या पूर्व पतीविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती सतत फोन करून त्रास देत असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तो तिला व तिच्या मुलीला धमकी देत ​​असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीच्या गोमती नगरमध्ये राहणारी IAS शुभ्रा सक्सेना हिचे 2003 मध्ये तिचे शशांक गुप्तासोबत लग्न झाले होते. त्यांना ९ वर्षांची मुलगीही आहे. लग्नानंतर पती शशांकने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केल्याचा आरोप शुभ्राने केला. त्यानंतर जुलै 2020 मध्ये दोघांनी एकमेकांपासून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हे देखील पहा -

शुभ्राच्या म्हणण्यानुसार, घटस्फोटानंतर शशांकने तिच्या मुलीचा पाठलाग आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. मुलीच्या हक्कावरूनही दोघांमध्ये वाद सुरू आहे. 2 महिन्यांपूर्वी शशांक लखनऊमध्ये घरी आला होता आणि त्याने पत्नीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर शुभ्राने शशांकवर गुन्हा दाखल केला.

शुभ्राच्या म्हणण्यानुसार, शशांकच्या या सर्व कृत्यांमुळे नाराज होऊन ती ५ मार्चला तिची मैत्रिण आणि कानपूर डीएम नेहा शर्मा यांच्याकडे पोहोचली. शुभ्राने नेहाला सांगितले की तिचा पती तिला रात्री उशिरा मेसेज करून त्रास देत आहे. शुभ्राने मेसेजला प्रतिसाद न दिल्याने शशांकने डीएम नेहा शर्माला कॉल करून तिला शिवीगाळ केली. यानंतर शुभ्राने शशांकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंह यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

Mumbai : बोगस DCP ला करायचा मदत, मुंबईत PSI ला बेड्या, चोर-पोलिसाचं बिंग असं फुटले

Crime: सून- सासऱ्याच्या अफेअरने संपूर्ण कुटुंबाचा शेवट, नवऱ्याने स्वत: विष पित बायकोला दिलं; नंतर वडील अन् भावाचा मृतदेह आढळला

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT