Imran Khan Saam TV
देश विदेश

मी राजीनामा देणार नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार- इम्रान खान

इम्रान खान म्हणाले की, मी ठरवले होते की, असे परराष्ट्र धोरण बनवू ज्याचा फायदा पाकिस्तानी जनतेला होईल.

वृत्तसंस्था

विरोधकांच्या अविश्वास ठरावामुळे अडचणीत सापडलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी संध्याकाळी देशातील जनतेला संबोधित केले. देशाला संबोधित करताना इम्रान खान (Imran Khan Speech) म्हणाले की, माझ्याकडे सर्व काही आहे. २५ वर्षांपूर्वी मी सेवेच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केला होता. न्याय, मानवता आणि स्वाभिमानासाठी मी राजकारणात आलो. राजकारणात पाऊल ठेवताना मी संकल्प केला होता की, मी कुणापुढे झुकणार नाही, माझ्या समाजालाही झुकू देणार नाही. मी २० वर्ष क्रिकेट खेळलो आहे. मला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणं माहिती आहे. मी राजीनामा देणार नाही असे इम्राम खाम म्हणाले आहेत.

इम्रान खान म्हणाले की, मी ठरवले होते की, असे परराष्ट्र धोरण बनवू ज्याचा फायदा पाकिस्तानी जनतेला होईल. मी मुक्त परराष्ट्र धोरणाबद्दल बोललो. इम्रान म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांची सर्वात मोठी चूक ही होती की, 80 च्या दशकात पाकिस्तान दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेचा मित्र बनला. लक्षात ठेवा त्याच अमेरिकेने आपल्यावर निर्बंध लादले आहे. आधीच्या सरकारांच्या चुकांमुळे पाकिस्तानचा हेवा होताना आणि खाली येताना मी पाहिले आहे.

अमेरिकेचा वकील असणे ही परवेझ मुशर्रफ यांची सर्वात मोठी चूक असल्याचे इम्रान खान म्हणाले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने अनेक बलिदान दिले ज्याचे श्रेय आपल्या देशाला मिळाले नाही. आधीच्या सरकारांच्या कार्यकाळात आपल्या देशात 400 ड्रोन हल्ले झाले, त्याचा निषेधही केला गेला नाही. या हल्ल्यांच्या विरोधात मी आंदोलन केले तेव्हा मला तालिबान खान म्हटले गेले. या लोकांची परराष्ट्र धोरणे कशी होती हे तुम्हाला कळावे म्हणून मी आज या गोष्टी सांगत आहे.

विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा परकीय कारस्थानांचा परिणाम असल्याचे इम्रान यांचे म्हणणे आहे. सत्तेतून हकालपट्टी करण्यासाठी परदेशातून फंडिंग केले जात असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. इम्रान अमेरिकेकडे बोट दाखवत असल्याचे मानले जात आहे. मात्र, यासंदर्भात अमेरिकेकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्यात हात असल्याचा आरोप फेटाळून लावत अमेरिकेने म्हटले आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर पाकिस्तानकडून कोणतेही पत्र पाठवले गेले नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT