Sonia Gandhi Speaks on Womens Reservation Bill in Loksabha/Sansad TV SAAM TV
देश विदेश

Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला माझा पाठिंबा, तात्काळ लागू करा : सोनिया गांधी

Parliament Special Session Live : संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत आज, बुधवारी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू झाली.

Nandkumar Joshi

Parliament Special Session Live :

संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत आज, बुधवारी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधींनी चर्चेला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे, असं सोनिया म्हणाल्या.

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा उल्लेख केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा महिलांचा सहभाग निश्चित करणारे विधेयक राजीव गांधी यांनी आणले होते. राज्यसभेत ते सात मते कमी मिळाल्याने मंजूर होऊ शकले नाही, असेही त्या म्हणाल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने ते मंजूर केले. त्यामुळेच आज देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून १५ लाखांच्या जवळपास महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. राजीव गांधी यांचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते पूर्ण होईल. काँग्रेसचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर झाल्याचा आनंद आम्हालाही होईल, असे सोनिया म्हणाल्या.

विधेयक लागू करण्यास होणाऱ्या विलंबावरही सोनिया गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक चिंतेची बाब आहे. गेल्या १३ वर्षांपासून भारतीय महिला राजकीय जबाबदारी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता त्यांना आणखी काही वर्षे वाट पाहण्यास सांगितले जात आहे. भारतीय महिलांना अशा प्रकारे दिली जाणारी वर्तवणूक योग्य आहे का? असा सवालही सोनिया गांधींनी केला.

हे विधेयक तात्काळ लागू करावे अशी काँग्रेसची मागणी आहे. परंतु, यासह जातनिहाय जनगणना करून एससी, एसटी, ओबीसींमध्ये महिलांना आरक्षण देण्याची तजवीज करावी. त्यासाठी सरकारला जे पाऊल उचलायचे आहे, ते करावे. महिलांचे योगदान स्वीकारणे आणि त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्याची हीच सर्वात योग्य वेळ आहे. हे विधेयक लागू करण्यात आणि त्यात विलंब करणे हा भारतीय महिलांवरील अन्याय आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT