१० दिवस हसायचं नाही, दारु प्यायची नाही फक्त दुःखी रहायचं- 'किम जोंग उन'चा फर्मान Twitter/@Reuters
देश विदेश

१० दिवस हसायचं नाही, दारु प्यायची नाही फक्त दुःखी रहायचं- 'किम जोंग उन'चा फर्मान

आज शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी उत्तर कोरिया देशाचे दिवंगत तानाशाह तथा सर्वोच्च नेता किम जोंग इल यांची दहावी पुण्यतिथी आहे.

वृत्तसंस्था

उत्तर कोरिया: उत्तर कोरिया देशाचे दिवंगत तानाशाह तथा दिवंगत सर्वोच्च नेता किम जोंग इल (Kim Jong-il) यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियातील (North Korea) नागरिकांना 10 दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी त्यांची दहावी पुण्यतिथी आहे. या प्रसंगी उत्तर कोरियावर लादण्यात आलेल्या अनेक निर्बंधांपैकी त्यांनी नागरिकांच्या हसण्यावरही बंदी घातली आहे. उत्तर कोरियन लोकांना दारू पिण्यास, हसण्यावर, किराणा सामानाची खरेदी करण्यास आणि आनंद किंवा आराम मिळेल अशा कोणत्याही क्रियेवर १० दिवस बंदी घालण्यात आली आहे, असे सिनुइजू या सीमावर्ती शहरातील एका रहिवाशाने रेडिओ फ्री एशियाला सांगितले. (I don't want to laugh for 10 days, I don't want to drink alcohol, I just want to be sad - 'Kim Jong Un' decree)

हे देखील पहा -

10 दिवसांच्या शोक कालावधीत बंदीचे कोणतेही उल्लंघन केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकीच नागरिकांना मिळाली आहे. "पूर्वी, शोक काळात मद्यपान करताना किंवा नशा करताना पकडलेल्या अनेक लोकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना वैचारिक गुन्हेगार म्हणून वागणूक दिली गेली होती, "नियम मोडणाऱ्या त्या नागरिकांना दूर नेलं होतं आणि ते नागरिक पुन्हा कधीही दिसले नाहीत."असे एका नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या शोक कालावधीत, कोणालाही अंत्यसंस्कार, सेवा किंवा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तथापि, दुसर्‍या स्त्रोताने असा दावा केला की, पोलीसांनी शोक कालावधीसाठी "योग्य मूड" सुनिश्चित करण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला असाच आदेश लागू केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT