accident news  Saam TV Marathi
देश विदेश

15 लाखांच्या स्पोर्ट्स बाइकची कारला जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा चुराडा

hyderabad road accident : 15 लाखांच्या स्पोर्ट्स बाइकची कारला धडक दिली. अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Vishal Gangurde

हिमाचलनंतर हैदराबादमध्येही भीषण अपघात

१५ लाखांच्या बाईकची कारला धडक

अपघातात ५ जणांचा मृत्यू

हिमाचलमध्ये भरधाव कार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हैदराबादमध्येही भीषण अपघाताची घटना घडली. हैदराबादमध्ये १५ लाखांच्या बाईकने कारला धडक दिली. दुचाकी आणि कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसहित ५ जणांचा मृत्यू झाला. १५ लाखांच्या महागड्या दुचाकीने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर झाला. हैदराबादच्या मेहबूबनगर पालकोडा बायपास रोडवर मध्यरात्री अपघाताचा थरार घडला.

अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. पालकोंडा बायपास रोडवर युवकांच्या दुचाकीच्या शर्यतीदरम्यान स्पोर्ट्स बाइक आणि कारची धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पालकोंडा बायपास रोडवर सोमवारी रात्री १२.३० वाजता कार धिम्या गतीने वळण घेत होती. दुसरीकडे काही तरुणांची बाईकची शर्यत सुरू होती. एका स्पोर्ट्स बाइकने कारला धडक दिली. बाइकच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला.

अपघातात कारमधील हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ३० वर्षीय अर्शा बेगम, ७ वर्षीय उजेपा आणि २ वर्षीय उमरचा अपघाती मृत्यू झाला. बाइकवरील दोघांचा मृत्यू झाला. २५ वर्षीय याकूब अफजल अशी एकाची ओळख झाली आहे. दुसऱ्याची ओळख पटवण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे.

मध्यरात्री घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. दुर्घटनेनंतर बायपास रोडवर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी पोहोचून वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, पालकोंडा बायपास रोडवर रात्रीच्या वेळी दररोज दुचाकीच्या शर्यत होतात. स्थानिकांनी अनेकदा पोलिसांना तक्रारी दिल्या आहेत. त्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी आधीच कारवाई केली असती, तर ५ जणांचे जीव वाचले असते. पोलिसांनी बेकायदेशीर दुचाकी शर्यतीच्या विरोधात कारवाई सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT