Hyderabad Crime News Saam Tv
देश विदेश

Hyderabad Crime News: धक्कादायक! बायकोने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने नवरा संतापला; सासरच्या मंडळींसोबत केलं भयानक कृत्य

Crime News: धक्कादायक! बायकोने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने नवरा संतापला; सासरच्या मंडळींसोबत केलं भयानक कृत्य

Satish Kengar

Hyderabad Crime News: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीपासून विभक्त होण्यासाठी त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. याचाच राग मनात धरून तिच्या पतीने तिच्यासह संपूर्ण सासरच्या मंडळींना संपवण्याचा मोठा कट रचला होता.

महिलेचा पती हा ब्रिटनमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे. त्याने सासरच्या मंडळींना घरातील मिठ आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक विष मिसळून ठार मारण्याची योजना आखली होती. यामुळे महिलेच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडले होते आणि यातच तिच्या आईचा (वय 60) मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, मियापूर पोलिस ठाण्यात आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तहरीरच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा मित्र आणि त्याच्या पत्नीच्या (तक्रारदार) नातेवाईकांसह सहा जणांना 18 ऑगस्ट रोजी अटक केली. तर आरोपी फार्मासिस्ट फरार आहे. तक्रारदार आणि फार्मासिस्ट यांच्यात 2018 मध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांचे हे दुसरे लग्न आहे. (Latest Marathi News)

पत्नीने पतीला घटस्फोटाची पाठवली नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती-पत्नी याच शहरात राहत होते. मात्र काही दिवसांतच आरोपीने पत्नीचा मानसिक छळ सुरू केला. नंतर आरोपी ब्रिटनला गेला आणि नंतर पत्नीला त्याने तेथे येण्यास सांगितले. पोलिसांनी सांगितले की, विश्वास दाखवून पत्नी आपल्या मुलीसह ब्रिटनला गेली. मात्र काही दिवसांतच आरोपीने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला.

या घटनांनंतर महिलेने ब्रिटनमध्ये पतीपासून वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि घर सोडल्यानंतर तिने पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या भावाचे लग्न ठरल्यानंतर ती जूनमध्ये हैदराबाद येथे तिच्या घरी आली. जिथे तिचे सर्व नातेवाईकही जमले होते. या लग्नात सहभागी होण्यासाठी फार्मासिस्टही हैदराबादला आला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या नातेवाईकांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. महिलेच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे जूनमध्ये तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, नंतर घरात राहणार्‍या महिलेचा भाऊ, वडील आणि मेहुणी यांनाही जुलैमध्ये हाच त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच महिलेला आणि तिच्या मुलीलाही जुलाब होऊ लागले. त्यानंतर आई आणि मुलगी दोघेही उपचारासाठी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका डॉक्टरकडे गेले, त्यांनी त्यांना आर्सेनिकमुळे विषबाधा झाल्याची माहिती दिली.

पुढे महिलेच्या घरी जेवण करत असलेले तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांची चाचणी करण्यात आली. ज्यात त्यांच्या शरीरात आर्सेनिक मोठ्या प्रमाणात आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, महिलेला तिचा नातेवाईक आणि अपार्टमेंटच्या चौकीदाराच्या मुलावर संशय होता.

चौकशीत असे आढळून आले की, महिलेच्या पतीने (आरोपी) महिलेच्या नातेवाईकाच्या मदतीने त्याच्या मित्रांना तिच्या घरी पाठवलं. त्यांनी महिलेच्या किचनमध्ये ठेवलेल्या मीठ आणि मिरची पावडरमध्ये आर्सेनिक मिसळलं. पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर महिलेने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र पण तोपर्यंत आरोपी ब्रिटनला परतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT