Hyderabad Customs Seized Gold ANI
देश विदेश

Hyderabad Customs Seized Gold: अन् त्यानं गुदद्वारात लपवून आणलं 42 लाखांचं सोनं, पण विमानतळावर पोहचताच कारनामा उघड

Hyderabad Rajiv Gandhi International Airport: मस्तकवरुन हैदराबादमध्ये हा प्रवासी सोनं घेऊन येत होता.

Priya More

Hyderabad News: हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन (Rajiv Gandhi International Airport) सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. परदेशातून भारतामध्ये हे सोनं आणण्यात आले होते. या सोन्याची किंमत तब्बल 42 लाख रुपये आहे. महत्वाचे म्हणजे या व्यक्तीने हे सोनं गुदद्वारात लपवून आणले होते. पण त्याचा सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न फसला.

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तकवरुन हैदराबादमध्ये हा प्रवासी येत होता. पण हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी दरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात ही कारवाई केली आहे या प्रवाशाकडे सोन्याची पेस्ट सापडली. त्याने ही सोन्याची पेस्ट गुदद्वारामध्ये लपवली होती. अटक करण्यात आलेला हा प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारा आहे.

या प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी 685.7 ग्रॅमचे सोनं जप्त केले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 42,78,768 रुपये इतकी आहे. या प्रवासीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने हे सोनं कुठून आणि कोणासाठी आणले होते याचा तपास ते करत आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या प्रवाशाने आपल्या गुदद्वारात सोन्याची पेस्ट असलेल्या दोन छोट्या आकाराच्या ट्यूब लपवल्या होत्या. कस्टम अधिकाऱ्यांच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कस्टम अधिकाऱ्यांनी याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दिसत आहे की, कस्टम अधिकारी या ट्यूब ब्लेडच्या सहाय्याने फाडून त्यामधील सोन्याची पेस्ट दाखवत आहेत.

दरम्यान, मागच्या आठवड्यामध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी दुबई आणि रियादवरुन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोन्याची तस्करी प्रकरणी अटक केली होती. या आरोपींकडून 1.81 कोटी रुपयांचे आणि 1.13 कोटी रुपये किमतीचे सोनं जप्त केले होते. त्याने हे सोनं एमर्जन्सी लाईटच्या बॅटरीमध्ये लपलेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

SCROLL FOR NEXT