Hyderabad Adult Content News Saam Tv News
देश विदेश

Adult Content: मास्क घालून लैंगिक कृत्याचे लाईव्ह स्ट्रीम, HD व्हिडिओ तयार करून व्हायरल; शेवटी आरोपी अटकेत

Adult Content: हैदराबादमध्ये एका जोडप्याला मोबाईल अॅपवर लैंगिक कृत्य लाईव्ह स्ट्रीम केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पैशांच्या बदल्यात व्हिडिओ शेअर करत असल्याचं पोलिसांनी उघड केलं.

Bhagyashree Kamble

लैंगिक कृत्य मोबाईल अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. या बदल्यात त्यांना पैसे मिळत होते. ही धक्कादायक घटना हैदराबादमधील अंबरपेट परिसरातून समोर येत असून, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या घरातून अनेक उपकरणे जप्त केल्या आहेत. यामध्ये हाय डेफिनेशन कॅमेराचाही समावेश आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे कमावण्यासाठी त्यांनी या बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा व्यवसायाने कॅब ड्रायव्हर आहे. जोडप्याने जलद पैसे कमावण्यासाठी वेगळ्या मार्गाचा निवड केला. पोलिसांनी सांगितले की, हे जोडपे त्यांच्या लैंगिक कृत्यांचे व्हिडिओ शूट करायचा. त्यानंतर अॅपवर शेअर करून पैसेल कमवायचा.

हा अॅप वापरणारा वर्ग तरूण आहे. अॅपमधील वापरकर्ते कंटेंटच्या बदल्यात पैसे देतात. लाईव्ह स्ट्रीम केलेल्या कंटेंटच्या बदल्यात त्यांना दोन हजार रूपये दिले जातात. तर, रेकॉर्ड व्हिडिओच्या बदल्यात त्यांना ५०० रूपये मिळतात. कॅब ड्रायव्हिंगमधून मिळणाऱ्या कमाईपेक्षा अधिक पैसे बेकायदेशीर कामातून मिळत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे त्यांचे कृत्य एचडी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. ओळख लपवण्यासाठी हे जोडपे तोंडावर मास्क लावत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. ईस्ट झोन टास्क फोर्सने त्यांच्या घरावर छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. दोघांविरूद्ध आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT