Telangana Bus Fire News Saam TV
देश विदेश

Telangana Express Train Fire News: तेलंगणात एक्स्प्रेसला भीषण आग, महामार्गावर धावती बसही पेटली

TSRTC Bus Fire News: सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Ruchika Jadhav

Hyderabad Bus Accident News: समृद्धी महामार्गावरील बस अपघातातून नागरिक सावरत नाहीत तोच तेलंगणात अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. तेलंगणातील हैदराबाद येथे एका धावत्या बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीये. (TSRTC Bus Fire News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हैदराबादमध्ये (Hyderabad) काल रात्री TSRTC बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये सुमारे ११ जण प्रवास करत होते. धूर येऊ लागल्याने प्रवाशी लगेच बसमधून खाली उतरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. बस भेल (हैदराबाद) येथून विजयवाडाकडे जात होती.

एक्सप्रेस ट्रेनच्या तीन डब्ब्यांना आग

तेलंगणात वाहनांना आग लागल्याच्या सलग दोन घटना घडल्या आहेत. बोम्मैपल्ली आणि पागीडिपल्ली दरम्यान फलकनुमा एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आज आग लागली होती. प्रवाशांनी भरलेल्या तीन्ही डब्ब्यांना आग लागताच एक्सप्रेस थांबवण्यात आली.

एक्सप्रेस ट्रेन थांबवल्यावर सर्व प्रवाशांना येथून सुखरुप उतरवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लागोपाठ तेलंगणात दोन अपघाताच्या घटना घडल्याने नागरकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT