Viral News  Meta Ai
देश विदेश

Viral News : बायकांची वाटणी, पतीची चटणी; नवऱ्याला तीन-तीन दिवसाला वाटून घेतलं अन् ठेवला एका दिवसाचा विकऑफ

Bihar News : '३ दिवस एका बायकोकडे, ३ दिवस दुसऱ्या बायकोकडे आणि १ दिवसाची सूट' अशी एका नवऱ्याच्या आठवड्याची विभागणी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात करण्यात आली आहे. बिहारमधील या प्रकरणाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

Yash Shirke

'दोन बायका फजिती ऐका', ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. पण खऱ्या आयुष्यात एका माणसाला या म्हणीचा प्रत्यय आला आहे. बिहारच्या एका माणसाची त्याच्या दोन बायकांमध्ये वाटणी करण्यात आली आहे. या व्यक्तीला आठवड्यातील ३ दिवस पहिल्या बायकोकडे, तर उरलेले ३ दिवस दुसऱ्या बायकोकडे राहावे लागणार आहे. तसेच उरलेला एक दिवस सुट्टी म्हणून मिळणार आहे.

एखाद्या विनोदी चित्रपटाप्रमाणे बिहारमध्ये एक घटना घडली आहे. बिहारच्या पूर्णियामध्ये एका व्यक्तीने पत्नी-मुलं असतानाही लपूनछपून दुसऱ्यांदा लग्न केलं. त्याने दुसऱ्या बायकोबद्दल सगळ्यांपासून लपवून ठेवलं. पण जेव्हा पहिल्या बायकोला आपल्या नवऱ्याला दुसऱ्या लग्नाबद्दल समजले तेव्हा तिने विरोध करायला सुरुवात केली.

पुढे त्या दोन्ही बायकांमध्ये वाद सुरु झाला. भांडणाला कंटाळून नवरा दुसऱ्या बायकोकडे राहू लागला. त्याने मुलांच्या खर्चासाठी पैसे देणे देखील बंद केले. यामुळे वैतागून त्या व्यक्तीच्या पहिल्या बायकोने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आले.

पुढे कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी 'आठवड्याच्या सात दिवसांपैकी ३ दिवस नवरा पहिल्या बायकोला वेळ देईल आणि ३ दिवसात तो दुसऱ्या बायकोकडे राहील. उरलेल्या एका दिवसाची नवऱ्याला सूट दिली जाईल. तसेच त्याला पहिल्या बायकोच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी दर महिन्याला ४ हजार रुपये द्यावे लागतील' असे फैसला सुनावला. या निकालाची देशभरात चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT