Husband Cheating Wife Case :  Saam TV
देश विदेश

Shocking News: फेसबुकवर प्रेम जडलं, पळून जाऊन लग्न केलं; पण नवराच निघाला बाई

Husband Cheating Wife Case: लग्नाच्या पहिल्याच रात्री तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकरली.

Satish Daud

Husband Cheating Wife Case: फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीची ओळख तरुणासोबत झाली. दोघेही एकमेकांसोबत चॅट करु लागले. दोघांमध्ये छान मैत्री जमली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला, की त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दोघांनी लग्नही केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकरली.

तरुणीला आपल्या नवऱ्याचं असं काही गुपित कळालं, की तिची झोपच उडाली. डोळ्यावरील आंधळ्या प्रेमाची पट्टी एका क्षणातच बाजूला झाली. कारण, या तरुणीने ज्याच्यासोबत लग्न केलं होतं, तो पुरूष नसून बाई होता. आपली फसवणूक झाल्याचं कळताच तिने तातडीने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी (Police) तातडीने दोन्ही मुलींकडील कुटुंबियांना बोलावून घेतलं आणि संगतमताने हा वाद मिटवला. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार बिहारमधील छपरा जिल्ह्यात घडला आहे. या प्रेमप्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राम येथे राहणाऱ्या एका तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून बिहारमधील सारण जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणासोबत मैत्री झाली. दोघांमध्ये चॅटिंग आणि काँलिंग सुरू झाली. कालांतराने दोघेही एकमेकांच्या प्रेमात (Love Affair) पडले.

प्रेमप्रकरणानंतर तीन महिन्यातच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांची जात वेगळी असल्याने घरून लग्नाला होकार मिळणार नाही. या भीतीने दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दोघेही घरातून निघाले आणि कानपूरमध्ये एकत्र भेटले.

तेथून दोघेही मुंबईला आले. मुंबईत (Mumbai News) आल्यानंतर दोघांनीही मंदिरात लग्न केले आणि तिथेच राहू लागले. तरुणाने मुंबईत नोकरी शोधली. पण लग्नाचा आणि संसाराचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण लग्नानंतर तरुणीला आपल्या जोडीदाराचे सत्य कळले.

नवरा पुरूष नसून स्त्री आहे हे नवरीला समजलं. आपली फसवणूक झाल्याचं कळताच तिने त्याला घेऊन तातडीने बिहार गाठलं. तेथे गेल्यानंतर दोघेही पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियाना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर दोघींनाही कुटुंबियांच्या स्वाधीन करून संगतमताने हा वाद मिटवला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT