husband brother tried to have physical relations with the women Saam TV
देश विदेश

Crime News : वहिनीला घरात एकटं बघून दीराची नियत फिरली; केलं संतापजनक कृत्य, काळीमा फासणारी घटना

मृत महिलेचा पती हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी घरात फक्त मृत महिला आणि तिचा दीर आरोपी जुबेर हे दोघेच होते

Satish Daud

पुलवामा : जम्मू काश्मीरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका नराधम दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याला विरोध केला असता, त्याने वहिनीची गळा दाबून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी ४८ तासांत तपासाची चक्रे फिरवत नराधम दीराला अटक केली आहे. जुबेर (वय २१ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून शबाना (वय २९ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील ही घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत महिलेचा पती हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी घरात फक्त मृत महिला आणि तिचा दीर आरोपी जुबेर हे दोघेच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर याची मृत शबाना हिच्यावर वाईट नजर होती.

मंगळवारी (१० जानेवारी) घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने वहिनीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला वहिनीने विरोध केला असता, आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हत्येनंतर आरोपीने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला.

दरम्यान, हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपीने घरातून पळ काढला. सकाळ होऊन सुद्धा घरातून कुणीच बाहेर न आल्याने शेजारील महिलेने दार ठोठावले. मात्र, कुणी प्रतिसाद देत नसल्याने तिने खिडकीतून डोकावून बघितले असता, हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पुलवामा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे. आईसमान असलेल्या वहिनीवरच दीराने जबरदस्ती करत तिची हत्या केल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT