UP Crime News : सौरभ हत्याकांडानंतर देशभरात खळबळ माजली आहे. मिम्स अन् जोक्समध्ये ड्रमचा उल्लेख केला जातोय. पण आता एका महिलेने आपल्या नवऱ्याला मारून ड्रममध्ये भरण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, ही घटना मेरठमध्येच घडली आहे. जिथे मुस्कानने प्रियकरासोबत मिळून पती सौरभची निर्दयीपणे हत्या केली होती. त्याच मेरठमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. दारूड्या नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर बायकोने त्याला ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. त्याचा हात कापला, डोक्यात विट मारली. घाबरलेला नवरा धावत धावत पोलिसांत पोहचला अन् तक्रार केली. त्याची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले. पत्नीने नवऱ्याच्या आरोपाचे खंडण केलेय.
दररोज वाद, संतापलेल्या पत्नीने दिली धमकी -
बायको दररोज वाद घालत होती. कित्येकवेळा शेजाऱ्यांनी आमचा वाद सोडवला आहे. रविवारी रात्री दारू पिऊन घरी आलो होते. त्यावेळी बायकोसोबत कडाक्याचे भांडण झाले. झोपण्यासाठी निघालो होते, त्यावेळी पत्नीने डोक्यात विट मारली. हात चावला. जीवे मारून तुला ड्रममध्ये भरू का? अशी धमकी दिली, असा आरोप तरूणाने पोलिसांसमोर पत्नीवर केला. दरम्यान, बायकोने डोक्यावर विट मारली. हाताला जोरदार चावा घेतला. रक्ताच्या थारोळ्यात व्यक्ती पोलिसांत पोहचला होता. त्या तरूणाच्या तोंडावर नखाचे व्रण दिसत होते.
ड्रममध्ये भरण्याची धमकी, पत्नीने आरोप फेटाळले
रक्ताच्या थारोळ्यात तरूण पोलिसांत पोहचला आणि बायकोविरोधात तक्रार दाखल केली. बायकोने मला मारून ड्रममध्ये टाकण्याची धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ब्रह्मपुरीमध्ये झालेल्या हत्याकांडासारखे तुलाही मारून ड्रममध्ये भरेल, असे तरूणाने पत्नीच्या विरोधात धमकी दिल्याचा आरोप केला. थोड्या वेळानंतर पत्नी पोलिसांत आली अन् आरोप फेटळले. नवरा दारू पिऊ मारत असल्याचा आरोप तिने केला. दरम्यान, पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतली अन् प्रकरण मिटवले. जखमी तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.