चक्रीवादळाचा धोका; बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र Saam Tv
देश विदेश

चक्रीवादळाचा धोका; बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र

महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. भारताच्या हवामान खात्याने IMD सध्या बंगालच्या उपसागरात Bay Of Bengal तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा Low Pressure Area हा येत्या 12 तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा Hurricane धोका निर्माण झाला आहे. यामुळे आजपासून मुंबईसह Mumbai Rain राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलं आहे.cyclone in bay of bengal

भारतीय हवामान शास्त्र खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी चक्रीवादळाविषयी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होऊ शकत. याच्या परिणामी येत्या 12 तास मध्ये चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ Hurricane in the Bay of Bengal निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा Odisha किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT