Viral Video: Hundreds of birds mysteriously plummet to their deaths in Chihuahua Mexico Twitter/@stillgray
देश विदेश

Mexico Viral Video: पक्ष्यांचा थवाच्या-थवा रहस्यमयपणे हवेतून जमिनीवर कोसळला, शेकडो पक्ष्यांचा मृत्यू...

Mexico Birds Viral Video: व्हिडिओमध्ये पक्षी रस्त्यावर निर्जीव पडलेले दिसत आहेत. एवढे पक्षी रहस्यमयपणे आकाशातून का पडले याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेस्किको सिटी: मेक्सिको या देशामध्ये, पक्ष्यांचा एक कळप रहस्यमयपणे आकाशातून पडला, त्यापैकी बरेच पक्षी (Birds) खाली फुटपाथवर कोसळले आणि मरण पावले. या विचित्र घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) 7 फेब्रुवारी रोजी शेकडो पिवळ्या रंगाचे डोके असलेले शेकडो काळे पक्षी आकाशातून खाली पडले. स्थानिक वृत्तवाहिनी आउटलेट एल हेराल्डो डी चिहुआहुआच्या मते, मेक्सिकोमधील (Mexico) चिहुआहुआ येथील रहिवाशांनी फुटपाथवर शेकडो मृत पक्षी आढळल्यावर पोलिसांना कळवले. (Hundreds of birds mysteriously plummet to their deaths in Chihuahua Mexico)

पहा व्हिडिओ:

lvaro Obregón च्या विभागीय पोलिसांनी सांगितले की त्यांना सोमवारी सकाळी 8.20 च्या सुमारास मृत पक्षांसंदर्भात अनेक फोन येऊ लागले. सुरक्षा कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये मोठ्या काळ्या भोवऱ्यात पक्ष्यांचा कळप घरांवर पडताना दिसला. तर काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले मात्र शेकडो अनेकांचा मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये पक्षी रस्त्यावर निर्जीव पडलेले दिसत आहेत. एवढे पक्षी रहस्यमयपणे आकाशातून का पडले याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, परंतु व्हायरल या व्हिडिओने अनेक सिद्धांतांना जन्म दिला.

यूएसए टुडेच्या मते, एका पशुवैद्यकाने असा अंदाज वर्तवला की, हे पक्षी एकतर विषारी धुक्यांमुळे, हिटरमुळे किंवा विजेच्या तारांवर बसून त्यांना विजेचा धक्का बसला असेल. सोशल मीडियावर काही लोकांनी असाही अंदाज लावला की, 5G हे रहस्यमय मृत्यूचे कारण असू शकते. आता या पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास आता केला जातोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT