जळत्या 'विस्तवा'वरुन अनवाणी चालण्याची अनोखी परंपरा; पहा Video

जळत असलेल्या लाकडाच्या निखाऱ्यावरून चालण्याने देवाला घातलेलं साकडं पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जळत्या 'विस्तवा'वरुन अनवाणी चालण्याची अनोखी परंपरा; पहा Video
जळत्या 'विस्तवा'वरुन अनवाणी चालण्याची अनोखी परंपरा; पहा VideoSaam TV
Published On

अकोला: तप्त आणि जळत असलेल्या लाकडाच्या निखाऱ्यावरून तुम्हाला कोणी चालायला सांगितले तर तुमच्या अंगावर न चालताच काटे येतील. मात्र अकोल्यातील (Akola) पातूर तालुक्यातल्या मळसूर या गावात यात्रेत अनेक वर्षापासून एक अनोखी परंपरा आजही पाळली जाते. जळत असलेल्या तप्त निखाऱ्यावरून भाविक अनवाणी पायाने चालतात. जळत असलेल्या लाकडाच्या निखाऱ्यावरून चालण्याने देवाला घातलेलं साकडं पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अकोल्यातील मळसूर येथे सोपीनाथ महाराजांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. (Akola Latest News In Marathi)

यात्रेला परिसरातील हजारो नागरिक येत असतात. या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे जळत असलेल्या लाकडाच्या निखाऱ्यावरून चालण्याचे. ही अग्निपरीक्षा आजही भाविक भक्त पाळतात. मंदिरा समोर एक खड्डा केला जातो. या खड्ड्यात लाकडे जाळली जातात. निखारा तयार झाल्यावर देवाला घातलेलं साकडं पूर्ण व्हावं या श्रद्धेपायी भाविक जळत असलेल्या लाकडाच्या तप्त निखाऱ्यावरून चालत जातात. या गरम निखाऱ्यावरून चालताना कुठलीही इजा होत नसल्याचा दावा भाविक करतात. आणि या तप्त निखाऱ्यावरून चालल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत असल्याचेही भक्तांची भावना आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com