HRTC Bus Accident In Shilma Saam Tv
देश विदेश

दुर्देवी घटना! चालकाचं नियंत्रण सुटलं अन् प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली!

या दुर्देवी घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला

साम टिव्ही ब्युरो

शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिमला शहराजवळ एक भयंकर दुर्घटना घडली. शिमला येथे प्रवाशांनी भरलेली बस अचानक दरीत कोसळली. या दुर्देवी घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केलं आहे. (HRTC Bus Accident In Shilma)

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस प्रवाशांना घेऊन नागरोटा (कांगडा) येथून शिमल्याकडे येत होती. बसमध्ये 20 ते 23 जण प्रवासी होते. बस हिरा नगर परिसरात एका घाटात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट 100 फूट खोल दरीत कोसळली.

या दुर्देवी घटनेत बसमधील एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Bus Accident Latest News)

गेल्या काही दिवसांपासून शिमला परिसरात अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी देखील शिमल्यात पिकअप व्हॅन दरीत कोसळली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. शिमला मंडी येथे सफरचंद उतरवून पिकअप व्हॅन परतत होती. या अपघातात अन्य दोन तरुणही जखमी झाले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT