पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना जीव गेला. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला चढवला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारताने आज मध्यरात्री हल्ले आहेत. या कारवाईला भारताकडून थेट आणि योग्य प्रतिसाद मानलं जातंय.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक पर्यटक आणि नवविवाहित जोडप्याचा समावेश होता. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर हे नाव राष्ट्रीय शोक आणि सूडाचे प्रतीक आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ हे नाव निवडण्यात आलंय. या कारवाईद्वारे भारत सरकारकडून पाकड्यांना हा संदेश देण्यात आला आहे की, दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांनी दोघांनी मिळून ही कारवाई केली. एकूण ९ दहशतवाद्यांचे तळ यावेळी टार्गेटवर ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४ पाकिस्तानात आणि ५ पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. दरम्यान ज्या ठिकाणी हल्ले झाले त्यात बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट या शहरांचा समावेश आहे.
या हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने आपल्या हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवलंय. याशिवाय इशारा दिला आहे की, ते स्वतःच्या इच्छेनुसार, वेळेनुसार आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केलीये. याशिवाय त्यांनी आदोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. त्यांनी सांगितले की, हा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल अशी आशा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.