Accident saam tv
देश विदेश

सुलतानपूरमध्ये भीषण अपघात, कार दुभाजकाला धडकली, तीन जण जिवंत जळाले

या अपघातात कारने अचानक पेट घेतला.

वृत्तसंस्था

सुलतानपूर - पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर लखनौहून आझमगढकडे जाणारी कार गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अरवल किरी करवत हवाई पट्टीजवळ दुभाजकाला धडकली. त्यामुळे कारने पेट घेतला. या अपघातात (Accident) कारमधील तीन जण जिवंत जळाले आहेत. यूपीडीएच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरून अग्निशमन (Fire Brigade) दलाच्या पथकाने अग्निशमन दलासह घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. रविवारी संध्याकाळी लखनौमधील ज्ञान भवन कपूरथला-महानगर येथे राहणारे आदित्य कोठारी यांचा मुलगा महेश नंद कोठारी यांच्या कारमधून तीन जण लखनौहून पूर्वांचल एक्सप्रेसवेमार्गे आझमगडला जात होते.

हे देखील पहा -

यादरम्यान कार गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अरवल किरीकरवटजवळ येताच अचानक कारचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. या अपघातात कारने पेट घेतला. कारमधील तीन जण जिवंत जळाले आहेत. माहितीवरून, यूपीडीचे मुख्य नोडल सुरक्षा अधिकारी राजेश कुमार पांडे यांच्या सूचनेनुसार, इतर सुरक्षा कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले.

एक्स्प्रेस वेवर सीएफओ संजय कुमार शर्मा यांच्या सूचनेवरून अग्निशमन दलाचे जवान सत्य प्रकाश सिंह, शत्रुघ्न प्रताप, राजेश सिंह घटनास्थळी पोहोचले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. प्रतापगढचा रहिवासी विक्रम सिंह आणि लखनऊचा रहिवासी आदित्य कोठारी अशी कारमधील दोन जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. तर तिसऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT