River Accident saam tv
देश विदेश

River Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू

Pakistan Road Accident: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे प्रवाशांनी भरलेली व्हॅन यासीन नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले आहेत. नदीत बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. गिलगिटमधून हुंदूर गावाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली व्हॅन नोह ब्रिजजवळ यासीन नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाने नदीतून 11 मृतदेह आणि तीन जखमी प्रवाशांना बाहेर काढले आहे. पण व्हॅनमध्ये आणखी काही प्रवासी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीत बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.

नदीतून 11 मृतदेह बाहेर काढले

Geo News ने दिलेल्या वृत्तानुसार, ही व्हॅन गिलगिटमधून वरच्या यासीन खोऱ्यातील हुंदूर गावाकडे जात होती. गुरुवारी रात्री नोह ब्रिजजवळ ड्रायव्हरचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि व्हॅन थेट यासीन नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नदीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं.

सुरुवातीला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव अधिकाऱ्यांनी दिली होती. तसंच अनेक जण जखमी असल्याचेही सांगण्यात आलं होतं. पण शोधमोहीम सुरू असताना नदीतून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा 11 वर पोहोचला. जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी गाहकुचमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गाहकुच हे गिजर जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

अंधारामुळे बचावकार्यात अडचणी

अपघातानंतर नदीत बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. पण रात्रीच्या अंधारामुळे बचाव पथकाला शोधमोहीम राबवताना अनेक अडचणी येतायत. या कामासाठी गिलगिटमधून विशेष जल बचाव पथकालाही बोलावण्यात आलं. व्हॅनमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नदीत आणखी कोणी बेपत्ता आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

काही दिवसांपूर्वीही पाकिस्तानमध्ये मोठा अपघात

गिलगिट-बाल्टिस्तानमधील हा अपघात ताजा असतानाच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला होता. 7 नोव्हेंबर रोजी हुंज्यामधून रावळपिंडीकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली बस हजारा मोटरवेवर हवेलियन इंटरचेंजजवळ ट्रेलरला धडकली होती. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जण जखमी झाले होते. या घटनेची चौकशी नॅशनल हायवे आणि मोटरवे पोलिसांनी सुरू केली होती.

याआधीही डोंगराळ भागात भीषण अपघात

पाकिस्तानच्या डोंगराळ भागात याआधीही अनेक मोठे अपघात झाले आहेत. 2018 मध्ये होपर खोऱ्याजवळ प्रवाशांनी भरलेली व्हॅन खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता.

तसंच मे 2024 मध्ये रावळपिंडीहून गिलगिट-बाल्टिस्तानकडे जाणारी बस दियामेर जिल्ह्यात डोंगरातील रस्त्यावरून खोल दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात किमान 20 जणांचा मृत्यू झाला होता, तर अन्य 21 जण जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोणत्याही आमदाराला फोन अथवा मेसेज आलेला नाही - आमदार संग्राम जगताप

नागपूर शहराला 'संत्र्याचे शहर' किंवा 'ऑरेंज सिटी' का म्हणतात?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाल्या?

Makeup Removal Tips: रोज मेकअप करता? मग मेकअप काढताना या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

India vs New Zealand: मॅट हेन्री भारताला नडला! पत्त्यांप्रमाणे गडगडली टीम इंडिया, न्यूझीलंडकडून 244 रन्सने पराभव

SCROLL FOR NEXT