Terrible Accident Saam Tv
देश विदेश

अमेरिकेच्या हायवेवर भीषण अपघात; एका पाठोपाठ ६० वाहने धडकली...(पहा Video)

अमेरिकेच्या पेंसिवेनियामध्ये हायवेवरती भीषण अपघात झाला आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: अमेरिकेच्या पेंसिवेनियामध्ये हायवेवरती भीषण अपघात झाला आहे. बर्फ (Ice) आणि वादळामुळे पुढचे काही देखील दिसत नसल्याने एका पाठोपाठ एक अशा ६० गाड्या धडकले आहेत. काही गाड्यांना आग (Fire) देखील लागली आहे. या अपघातामध्ये कमीत- कमी ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अशा प्रकारचे अपघात (Accident) भारत देशामध्ये होत असतात. याकरिता यमुना एक्स्प्रेस वे कुप्रसिद्ध आहे.

पहा व्हिडिओ-

अमेरिकेतील (United States) प्रसारमाध्यमांनुसार हा अपघात स्‍चूयलकिल काउंटी मधील हायवेवर झाला आहे. पोलिसांनुसार (police) या अपघातातील वाहनांची संख्या ४० ते ६० पर्यंत असू शकणार आहे. सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या अपघाताच्या व्हिडिओमध्ये (video) बर्फवृष्टीमुळे महामार्गावर फारच कमी दिसत आहे. वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे दिसत आहे.

अपघातानंतर वाहने तिथेच सोडून लोक पळत असताना दिसून येत आहेत. संपूर्ण रस्ता डोंगरांनी वेढलेला आहे. या दुर्घटनेत मृतांचा शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्‍चूयलकिलमधील ही दुसरी मोठी घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर- ट्रेलर आणि कार घसरून एकमेकांवर आदळताना दिसून येत आहेत. अपघातामुळे ६ वाहनांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT