Hong Kong Fire Massive Blaze in 2000-Flat Complex Wang Fuk Court in Tai Po, Hong Kong  saam tv
देश विदेश

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Hong Kong Residential Tower Fire: हाँगकाँगमधील २००० हून अधिक फ्लॅट्स असलेल्या सोसायटीला भीषण आग लागलीय. या सोसायटीचं नाव वांग फुक कोर्ट असं आहे. या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झालेत. दरम्यान ७०० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.

Bharat Jadhav

  • २००० फ्लॅट असलेल्या वांग फुक कोर्ट सोसायटीला भीषण आग लागलीय.

  • आगीत १३ जणांचा मृत्यू तर २८ जण जखमी झालेत.

  • ७०० पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे जवान बचाव आणि आगीला नियंत्रित आणण्याचे काम करत आहेत.

हाँगकाँगच्या ताई पो भागात अनेक निवासी इमारतींना आग लागल्याची घटना घडलीय. या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या जवानासह १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हाँगकाँगमधील वांग फुक कोर्ट नावाच्या सोसायटीमध्ये आग लागली आहे, ज्यामध्ये २००० हून अधिक फ्लॅट आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं वृत्त रॉयटर्सने वृत्त दिले आहे.

हाँगकाँग सरकारने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की वांग फुक कोर्टमध्ये दुपारी २:५१ वाजता आग लागली. सुरुवातीला आग कमी होती. परंतु संध्याकाळी ६:२२ वाजेपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं. जवळपास ७०० हून अधिक अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहे. पोलिसांनी जवळच्या इमारती रिकामी केल्या आहेत आणि एक हेल्पलाइन नंबरदेखील जारी केला आहे. इमारतींमध्ये अजूनही अनेक लोक अडकले आहेत आणि २८ लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी चाउ विंग-यिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १३ जणांपैकी ९ जणांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले, तर सहा जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत अग्निशमन कर्मचाऱ्याची ओळख वाई-हो अशी झालीय. अग्निशमन विभागाने सांगितले की दुपारी ३:३० च्या सुमारास त्यांचा वाई-होशी संपर्क तुटला. तो दुपारी ४ च्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Payal Gaming Private Video: 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडाली खळबळ

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT